अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, महिलेच्या पती-पुतण्यासह चौघे अटकेत
बेपत्ता झालेल्या राजीव बिडलान या तरुणाचे एका खानावळीतल काम करणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. यातूनच त्याची हत्या झाल्याचं समोर आलं.
कल्याण : कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार (Kalyan Extra Marital Affair Murder) उघडकीस आला आहे. खानावळीत काम करणाऱ्या महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून तिच्या पती-पुतण्यासह चौघा नातेवाईकांनी तरुणाची हत्या केली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यावर पोलिस ठाण्यात तक्रार दिली जाते. मात्र केवळ बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरुन कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करुन बेपत्ता झालेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याचं उघड केलं आहे. या प्रकरणात तीन जण अटकेत असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. बेपत्ता झालेल्या राजीव बिडलान या तरुणाचे एका खानावळीतल काम करणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते.
कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाड्यात राहणाऱ्या अजित बिडलान याने आपला भाऊ राजीव ओमप्रकाश बिडलान 21 ऑक्टोबर 2019 पासून बेपत्ता असल्याची तक्रार महात्मा फुले पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीच्या आधारे, राजीव कोणाच्या संपर्कात होता या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला.
जीन्स-टीशर्ट घातल्याने बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न, डोंबिवलीत तरुणाला अटक
राजीव हा रुग्णवाहिकेवर चालकाचे काम करत होता. तो ज्या खानावळीत जेवण करायचा, त्याच खानावळीत राहत होता. त्याच खानावळीत काम करणाऱ्या एका महिलेशी राजीवचे अनैतिक संबंध होते.
प्रेमसंबंधातून राजीव आणि संबंधित महिला कल्याणमधून पळून गेले होते. बाहेरगावी दोन महिने राहिल्यानंतर ते पुन्हा कल्याणमध्ये महिलेच्या घरी येऊन राहू लागले. त्यानंतर राजीव बेपत्ता झाला.
महिलेचा पती संजित जैसवार, पुतण्या उत्तम जैसवार, सावत्र भाऊ संदीप गौतम आणि मित्र राहुल रमेश लोट यांनी राजीवला दारु पाजून रिक्षाने फिरवलं. त्यानंतर त्याच्या छातीत धारदार हत्यार खूपसून त्याला जीवे मारलं. त्याचा मृतदेह मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्याच्या हद्दीतील वालशिंद गावातील झाडीत फेकून दिला. मात्र बेपता झलेल्या राजीवचा शोध घेत त्याच्या हत्येचा उलगडा (Kalyan Extra Marital Affair Murder) करण्यात अखेर महात्मा फुले पोलिसांना यश आलं.