कशेडी घाटात चाकरमान्यांची लूट, धावत्या बसच्या डिक्कीतून 50 हजारांचं सामान लंपास

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटात बसचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत काही चोरट्यांनी बसमध्ये चोरी केली.

कशेडी घाटात चाकरमान्यांची लूट, धावत्या बसच्या डिक्कीतून 50 हजारांचं सामान लंपास
Follow us
| Updated on: Aug 13, 2020 | 4:29 PM

रायगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या बसेस कशेडी घाटात (Kashedi Ghat Bus Robbery) लुटण्याचा प्रकार सुरु झाला आहे. काल (12 ऑगस्ट) रात्री गुहागरकडे येणाऱ्या एका खासगी बसला दरोडेखोरांनी लुटलं आहे. यावेळी बसच्या डिक्कीतून तब्बल 50 हजार रुपये किंमतीचं सामान चोरी करण्यात आलं आहे. याप्रकणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे (Kashedi Ghat Bus Robbery).

नेमकं प्रकरण काय?

ही खासगी बस विरार ते गुहागर जात होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटात बसचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत काही चोरट्यांनी बसमध्ये चोरी केली. यावेळी चार ते पाच चोरांनी चालत्या बसच्या डिक्कीतून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सामान चोरल्याची माहिती आहे.

बस मधील प्रवाशांच्या चोरीची घटना लक्षात येताच त्यांनी बस थांबवली. त्यानंतर या प्रकरणी पोलादपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, चोरी केलेल्या सामानाचं पोलीस शोध घेत आहेत.

“कोकणाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी खासगी बसने आणि खासगी वाहनाने येत आहेत. त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कशेडी घाटात पोलिसांनीही लक्ष देण्याची मागणी होत आहे”, अशी माहिती एका प्रवाशाने दिली (Kashedi Ghat Bus Robbery).

संबंधित बातम्या :

Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : उर्जामंत्री

Ganeshotsav 2020 | दगडूशेठ गणपतीची 127 वर्षांची परंपरा खंडित, यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.