वर्ध्यात क्षुल्लक कारणावरुन वाद, मित्राला विहिरीत ढकलून खून
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या पिंपरी येथे एका व्यक्तीला विहिरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आली (Wardha Murder).
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या पिंपरी येथे एका व्यक्तीला विहिरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आली (Wardha Murder). ही घटना पोळ्याच्या दिवशी (18 ऑगस्ट) संध्याकाळी घडली. प्रवीण उर्फ बालू खुडसंगे असं आरोपीचे नाव आहे. आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे, तर यादव चिडाम असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली (Wardha Murder).
पोळ्याच्या दिवशी प्रवीण आणि यादव हे दोघेही गावातील सार्वजनिक विहिरीच्या काठावर बसून होते. याच दरम्यान या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यावेळी प्रवीण खुडसंगे याला राग अनावर झाला आणि त्याने यादव (वय 48) याला विहिरीत ढकलले आणि तिथून पसार झाला.
या सर्व प्रकरणानंतर गावातील नागरिकांनी जखमी यादवला विहिरीबाहेर काढला आणि त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेत असतानाचा वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृतक यादव चिडाम याचा मोठा भाऊ उद्धव चिडाम यांच्या तक्रारीवरून चंद्रपूरच्या गिरड पोलिसांनी बालू खुडसंगे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर येथून अटक केली आहे.
प्रवीण फरार असताना पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशनचा वापर केला. तो परिसरात जंगलात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. पण, येथूनही त्याने पोलिसांना हुलकावणी दिली. शेवटी पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी त्याच्या पत्नीच्या मोबाईलची मदत घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील परसोडा या सासूरवाडीतून रात्री एका शेतातून त्याला अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या :
तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, वडिलांच्या प्रश्नाने मुलीचा संताप, उकळतं तेल वडिलांवर ओतलं