लातुरात थरार, अनैतिक संबंधातून पतीची हत्या, मग पत्नीची आत्महत्या, अखेर प्रियकरानेही स्वतःला संपवलं

पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पत्नी आणि प्रियकराने एकापाठोपाठ एक आत्महत्या केल्या.

लातुरात थरार, अनैतिक संबंधातून पतीची हत्या, मग पत्नीची आत्महत्या, अखेर प्रियकरानेही स्वतःला संपवलं
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 5:20 PM

लातूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या साथीने हत्या केल्यानंतर उद्विग्न पत्नीने आत्महत्या केली. प्रेयसीने आत्महत्या केल्यामुळे पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रियकरानेही स्वतःला संपवलं. लातूरमध्ये एकमेकांमध्ये गुंतलेल्या मृत्यूच्या या तीन थरारक घटना समोर आल्या आहेत. (Latur Wife Murders Husband later Commits Suicide Boyfriend Kills Self)

लातूर जिल्ह्यामधील रेणापूर तालुक्यातील खरोळा भागात अनैतिक संबंधातून तिघांच्या आयुष्याची अखेर झाली. पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पत्नी आणि प्रियकराने एकापाठोपाठ एक आत्महत्या केल्या. पतीचा मृतदेह आढळल्यानंतर एकामागून एक घटनेचे गूढ उलगडत गेले.

खरोळा भागात असलेल्या एका कोरड्या विहरीत लखन राऊतराव या विवाहित युवकाचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. साडीने हातपाय बांधून मृतदेह पोत्यात दफन केलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह आढळल्यानंतर खरोळा गावात मनिषा राऊतराव आणि विजय छपरे यांनी केलेल्या आत्महत्येचं गूढ उकललं.

हेही वाचा : पिंपरीत 20 वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या

विजय आणि मनिषा यांचे अनैतिक संबंध होते. मनिषाचा पती लखन हा यामध्ये अडसर ठरत होता, त्यामुळे मनिषा आणि विजय या दोघांनी मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेह दफन केल्याचा आरोप आहे. मात्र स्वतःच्याच पतीची हत्या केल्याने व्यथित झालेल्या मनिषाने स्वतःही आत्महत्या केली.

मनिषाच्या आत्महत्येनंतर विजयला पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. मात्र पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने विजय छपरे यानेही आत्महत्या केली. या दोन आत्महत्या झाल्यानंतर लखनचा मृतदेहही सापडला आणि अनैतिक संबंधाचा त्रिकोण पोलिसांना उलगडला.

या घटनेने विजय छपरेसह मनिषा आणि लखन यांचाही संसार होरपळला. त्यांची लहान मुलं उघड्यावर आली, तर मनिषा-विजयच्या अविचारी कृत्याने तिघांचा घात झाला.

(Latur Wife Murders Husband later Commits Suicide Boyfriend Kills Self)

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.