बायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या

पत्नीशी झालेल्या वादानंतर दारुच्या नशेत संगमनेर तालुक्यातील सुखदेव मधे यांनी जिलेटीनच्या कांडीचा तोंडात स्फोट घडवत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. (man commit suicide with gelatin blast)

बायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 6:16 PM

शिर्डी: बायकोशी भांडण झाल्यानंतर दारुच्या नशेत एका व्यक्तीने जिलेटीनची कांडीचा विजेच्या सहाय्याने तोंडात स्फोट करुन आत्महत्या केली. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या एलखोपवाडीतील गाढवलोळी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पठारभागात खळबळ उडाली आहे. जिलेटीनच्या स्फोटाने मृत व्यक्तीच्या डोक्याच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या. मंगळवारी(29 सप्टेंबर) रात्री 9.30 च्या सुमारास घडली. घारगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. (man commit suicide with gelatin blast)

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलापूर गावांतर्गत असलेल्या एलखोपवाडीतील गाढवलोळी येथील सुखदेव मधे हा व्यक्ती मंगळवारी रात्री दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी मधे यांचा मुलगा अनिकेतने त्यांना जेवण करण्यासाठी विचारले असता, त्यांनी नकार दिला. यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सुखदेव मधे हा आपल्या पत्नीबरोबर भांडण करू लागला. मुलगा अनिकेतने ‘भांडण करू नका’ असे वडिलांना सांगितले. मात्र, तरीही सुखदेव हा काही समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

अखेर रागाच्या भरात सुखदेवने घरातील एका खोलीत जाऊन दरवाजा बंद केला.  सुखदेवने दारूच्या नशेत जिलेटीनची कांडी तोंडात धरली. यानंतर विजेचा प्रवाह चालू केला यामुळे काही क्षणातच सुखदेवचे शीर धडावेगळे होत चिंधड्या उडाल्या. जोराचा आवाज झाल्याने घरातील सदस्यांनी तात्काळ खोलीच्या दिशेने धाव घेतली.

घटनेची माहीती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी येथील बॉम्बनाशक पथकाला पाचरण करण्यात आले. याप्रकरणी सुखदेव ढगे यांचा मुलगा अनिकेत मधे यांनी दिलेल्या माहितीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलीय. घारगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या:

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य

ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

(man commit suicide with gelatin blast)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.