दुधाच्या बिल वसुलीसाठी डेअरीवाल्याची दबंगगिरी, महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी दुधाचे बिल वसुलीच्या कारणावरुन एका दूध व्यवसायिकाच्या दबंगगिरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दुधाच्या बिल वसुलीसाठी डेअरीवाल्याची दबंगगिरी, महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 4:40 PM

कल्याण : कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी दुधाचे बिल वसुलीच्या कारणावरुन एका दूध व्यवसायिकाच्या (Milk Bill Vasuli Argument) दबंगगिरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कल्याण पूर्वेतील हाय प्रोफाईल अनमोल गार्डन सोसायटीत हा प्रकार घडला असून एका महिलेसोबत कशा प्रकारे गैरवर्तन केले गेले. हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे (Milk Bill Vasuli Argument).

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात अनमोल गार्डन येथे ही सोसायटी आहे. या सोसायटीत राहणारे एक कुटुंब या परिसरातील एका दूध डेअरीमधून दूध घेतं. मंगळवारी संध्याकाळी दूध व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा दुधाचे बिल घ्यायला आला असता महिलेने सांगितले की, दूधाचे बिल आधीच दिले आहे. एकदा जावून चेक कर. नंतर तो अल्पवयीन मुलगा वडील आणि काही तरुणांना सोबत घेऊन आला.

या अल्पवयीन मुलाने मारहाणीचा आरोप करत महिलेच्या कुटंबियांसोबत वाद सुरु केला. हा वाद इतका विकोपाला गेला की संपूर्ण सोसायटीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आला. तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण करण्याची धमकी दिली गेली.

या प्रकरणी महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. मात्र, दूध व्यावसायिकाकडून अशा प्रकारची वागणूक ही सवाल उपस्थित करणारी आहे.

Milk Bill Vasuli Argument

संबंधित बातम्या :

Hubali Shooting Case | हुबळी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, महाराष्ट एटीएसची मोठी कारवाई

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, लुधियाना हादरलं

चोरीच्या घटनेतील सराईत आरोपीला अटक, नवी मुंबई पोलिसांना मोठं यश

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.