पत्नी-मुलीला जागा देण्याच्या विनंतीनंतर वाद, रेल्वे प्रवाशांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
रेल्वेमध्ये पत्नी-मुलीला जागा देण्याची विनंती केल्याने एका तरुणाला त्याच्या पत्नी आणि मुलीसमोर मारहाण करण्यात (murder of passenger for railway seat) आली.

पुणे : रेल्वेमध्ये पत्नी-मुलीला जागा देण्याची विनंती केल्याने एका तरुणाला त्याच्या पत्नी आणि मुलीसमोर मारहाण करण्यात (murder of passenger for railway seat) आली. यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेसमध्य घडली आहे. सागर मारकड (26) असं या मृत तरुणाचे (murder of passenger for railway seat) नाव आहे.
सागर त्याची पत्नी, लहान मुलगी आणि आईसोबत तो पत्नीच्या चुलतीचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी उपळाई तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे जात होता. यावेळी त्याने पुणे रेल्वे स्टेशनवरुन मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेस पकडली. या गाडीत इंजिनच्या मागील दुसऱ्या क्रमांकाच्या जनरल डब्यात तो चढला. यावेळी जनरल डब्यात बसण्यास जागा नसल्याने सागर मारकड आणि त्याचे सर्व कुटूंब उभे होते.
गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटताच पती सागर यांनी दरवाजा जवळ असलेल्या सीटवरील एका महिलेस म्हणाला, माझ्या पत्नी जवळ लहान मुलगी आहे बसण्यासाठी थोडी जागा द्या, तेव्हा त्या महिलेने पती सागर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सागरनेही त्या महिलेस शिवीगाळ करू नका, असे सांगितले. यावेळी तिथे असलेल्या एका महिला गटाने सागर यांना आणखी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच महिलेसोबत असलेले सहा पुरुष आणि सहा महिला यांनी सागरसह त्याच्या कुटुंबियांना हाताने, पायाने आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
सागरला मारहाण करत असल्यामुळे त्याच्या पत्नीने आणि आईने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते सागर यांना काठीने मारत होते. त्या दरम्यान सागर हा मारहाणीमुळे डब्यातच खाली पडला. सागरला उठवण्याचा प्रयत्न त्याच्या बायकोने आणि आईने केला पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सागरच्या पत्नीने रेल्वेमधील चौन तीन वेळा ओढली गाडी थांबून पुन्हा सुरू झाली परंतु कोण ही मदतीसाठी आले नाही.
गाडीतील एका प्रवाशाने फोनद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेस गाडी दौंड रेल्वे स्टेशन येथे पहाटे दोनच्या सुमारास आली. तेव्हा दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यातील पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. मृत सागरला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्याचा लाथा, बुक्या आणि काठीने मारल्यामुळे रेल्वे डब्यातच जागीच मृत्यू झाला होता.