भावाची हत्या, कापलेले शीर घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांनी चुलत भावाची खुलेआम हत्या केली. चुलत भावाची हत्या केल्यानंतर या दोघांनी त्याचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर ते कापलेलं शीर घेऊन ते स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले आणि गुन्ह्याची कबुली दिली.

भावाची हत्या, कापलेले शीर घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात
Follow us
| Updated on: Jul 22, 2019 | 1:22 PM

हैद्राबाद :  तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांनी चुलत भावाची खुलेआम हत्या केली. चुलत भावाची हत्या केल्यानंतर या दोघांनी त्याचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर ते कापलेलं शीर घेऊन ते स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले आणि गुन्ह्याची कबुली दिली. हे दृश्य पाहून पोलीस ठाण्यातील पोलीसही आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी या दोन भावांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही आरोपींच्या मते, त्यांचा चुलत भाऊ शेख सद्दाम त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्यांनी त्याची हत्या केली.

मोहम्मद गौस (वय 22) आणि इरफान अशी या आरोपी भावांची नावं आहेत. मोहम्मद गौस हा मेकॅनिक आहे, तर इरफान कारचालक आहे. हे दोघेही शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शेख सद्दामला (वय 26) भेटायला गेले. तिथे या तिघांमध्ये आधी शाब्दिक चकमक उडाली, त्यानंतर याचं रुपांतर वादात झालं. इरफान आणि मोहम्मद गौस यांची बहीण रजिया हिला शेख सद्दामकडून दोन मुलं होती. शेख सद्दामने आपल्या मुलांचा सांभाळ करावा अशी इरफान आणि मोहम्मद गौसची इच्छा होती. मात्र, शेख सद्दाम त्यासाठी तयार होत नव्हता. याच कारणावरुन या तिघांमध्ये वाद झाला.

नारळ सोलणाऱ्या चाकूने गळा कापला

या वादादरम्यान, शेख सद्दाम ऐकत नसल्याचं पाहून इरफान आणि मोहम्मद गौसला राग अनावर झाला. त्यानंतर शेख सद्दामला धमकावण्यासाठी मोहम्मद गौसने बाजूला असलेल्या नारळ पाणी विकणाऱ्याचा चाकू घेतला. मात्र, शेख सद्दाम तरीही ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे राग अनावर होऊन मोहम्मद गौसने थेट त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. मोहम्मद गौसनंतर इरफाननेही शेख सद्दामवर हल्ला चढवला. जोपर्यंत शेख सद्दामचं शीर शरिरापासून वेगळं होत नाही, तोपर्यंत ते त्याच्यावर वार करत राहिले.

लोकांची बघ्याची भूमिका

ही घटना घडत असताना परिसरातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. कुणीही ही घटना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. शेख सद्दामचं शीर शरिरापासून वेगळं झाल्यानंतर इरफान आणि मोहम्मद गौसने त्याचं शीर उचललं आणि ते पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. पोलिसांसमोर त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली. सुरुवातीला पोलिसही हे धक्कादायक चित्र पाहून हैराण झाले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय

रजिया आणि शेख सद्दाम यांचा विवाह झालेला नव्हता. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. शेख सद्दाम रजियाला हैद्राबादला घेऊन गेला आणि तिथे तिला एका ठिकाणी घरकामाला लावलं. याच ठिकाणी या दोघांमध्ये संबंध जुळून आले. शेख सद्दामपासून रजियाला दोन मुलं आहेत. 2017 मध्ये शेख सद्दाम विवाहासाठी नकार देत असल्याने रजियाने आत्महत्येचाही प्रयत्न केला. या प्रकरणी हैद्राबादच्या सरुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक पद्मनाभ रेड्डी यांनी दिली.

संबंधित बातम्या :

कल्याण-डोंबिवलीच्या शिवसेना नगरसेविकेच्या विवाहित मुलीची हत्या

ब्लॅक पँथरचा डीपी, चिठ्ठीत द एण्ड, पुण्यात मोबाईल गेममुळे तरुणाची आत्महत्या

महिलेने अगोदर पोटच्या चिमुकल्यांना संपवलं, नंतर स्वतः गळफास घेतला

विवाहबाह्य संबंध असलेलं जोडपं लटकलेल्या अवस्थेत आढळलं

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.