लॉकडाऊनमध्ये कामधंदा नाही, आर्थिक अडचणीतून वाद, जन्मदात्या बापाकडून मुलाची हत्या
लॉकडाऊनमध्ये कोणताही कामधंदा नसल्याने, आर्थिक विवंचनेतून घरात झालेल्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झालं आहे.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात जन्मदात्या बापाने मुलाची गळा दाबून हत्या केली (Nalasopara Father Murder Son). लॉकडाऊनमध्ये कोणताही कामधंदा नसल्याने, आर्थिक विवंचनेतून घरात झालेल्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झालं आहे. नालासोपारा पश्चिम निलेमोरे गावातील साई गणेश वेल्फेअर सोसायटीतील, युनिक अपार्टमेंटच्या बिल्डिंग नं 5 मध्ये आज दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे (Nalasopara Father Murder Son).
अमन शेख (वय 32) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, ख्वाजामियाँ शेख (वय 54) असे आरोपी बापाचे नाव आहे. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ख्वाजामियाँ शेख, अमन शेख आणि अश्रफ शेख हे तिघे बाप-लेक नालासोपारा पश्चिम निलेमोरे गावातील साई गणेश वेल्फेअर सोसायटीच्या युनिक अपार्टमेंट बिल्डिंग नं 05 मध्ये राहतात. अमन शेख हा कोणताही कामधंदा करत नव्हता. तसेच तो व्यसनाच्या आहारीसुद्धा गेला होता (Nalasopara Father Murder Son).
अमन शेखला त्याचे वडील आणि छोटा भाऊ घरात राहू नये, असे नेहमी वाटत होते. यामुळे यांचे घरात वाद होत होते. टाळेबंदीत 4 महिने घरातील कुणालाच कामधंदा नसल्याने यांच्यात जास्तच वाद वाढले होते.
बुधवारी (29 जुलै) दुपारी लहान मुलगा अश्रफ हा घराबाहेर जेवण आणण्यासाठी गेला असताना अमन आणि त्याच्या वडिलांमध्ये वादविवाद झाला. याच वादविवादातून त्यांची झटापट झाली असता बापाने मुलाचा गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.
पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास, सुसाईड नोट सापडलीhttps://t.co/L2P0OrV1Hb#Suicide #GirlSuicide #Pune #Dhayari
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2020
Nalasopara Father Murder Son
संबंधित बातम्या :