भांडणाची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाची गळा चिरुन हत्या, 5 आरोपींना अटक

नालासोपाऱ्यात तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. (Nalasopara Murder Case 5 accused Arrest)

भांडणाची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाची गळा चिरुन हत्या, 5 आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 6:53 PM

नालासोपारा : नालासोपाऱ्यात तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. यानंतर आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी तुलिंग पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्येचा छडा लावून 5 आरोपींना अटक केली आहे. (Nalasopara Murder Case 5 accused Arrest)

पूर्वीच्या भांडणाची तक्रार का केली? याचा राग मनात धरुन या पाच जणांनी कट रचत 32 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत तुलिंग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन 5 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

दीपक मोरे (25), अमित कुमार (22), निर्मळ खडका (19), प्रशांत खाटकर (19) आणि प्रणय खाटकर (19) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. तर सद्दाम सय्यद (32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यामधील मुख्य आरोपी दीपक मोरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.

दीपक मोरेचे सदाम सय्यद याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर सय्यद याने मोरेविरोधात त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार का दाखल केली? याचा राग मनात धरून मोरे यांनी आपल्या इतर 4 साथीदारच्या मदतीने त्यांनी सय्यदच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार 5 सप्टेंबरला सद्दाम सय्यद याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर रिक्षातून त्याला वसईतील एव्हरशाईन परिसरातील रामरहिम नगर येथे नेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर तलवार, दांडूके, दगडाने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर हे सर्व फरार झाले होते.

या हत्येप्रकरणी तुलिंज पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली आहे. तसेच याप्रकरणाचा अवघ्या 24 तासात पोलिसांना छडा लावला. तसेच याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली. (Nalasopara Murder Case 5 accused Arrest)

संबंधित बातम्या : 

उसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.