घरगुती वादातून भाच्याकडून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण, मामाचा जागीच मृत्यू

सर्व घटना दारुच्या नशेत घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Nagpur Nephew beat Mama Due to Some Family Dispute) 

घरगुती वादातून भाच्याकडून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण, मामाचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 4:29 PM

नागपूर : घरगुती वादातून भाच्याने मामाची लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतुल सहारे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास साखरेला अटक केली आहे. ही सर्व घटना दारुच्या नशेत घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Nagpur Nephew beat Mama Due to Some Family Dispute)

मिळालेल्या माहितीनसुार, अतुल सहारे दारुच्या नशेत घरी गोंधळ घालत होता याची माहिती आरोपी विकास साखरेला मिळाली होती. त्यावेळी विकासने अतुलच्या घरी येऊन त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद वाढत गेला. हे दोघे ही रोज सोबत दारु प्यायचे. गेल्या काही दिवसांपासून दारु पिताना त्या दोघांचाही एकमेकांसोबत वाद व्हायचा.

काल अशाच प्रकारे दारु पित असताना विकास आणि अतुलमध्ये वाद सुरु झाला. यानंतर त्या दोघांनी एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर या दोघांमधला वाद वाढत गेला. यानंतर आरोपी विकासने अतुलच्या छातीवर, तोंडावर लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी अतुल खाली पडला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी धाव घेतली. मात्र अशा क्रूर पद्धतीने मारहाण करत हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी आरोपी विकासला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पाचपावली पोलीस पुढील तपास करत आहे. शुल्लक कारणावरून भाच्याने मामाची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nagpur Nephew beat Mama Due to Some Family Dispute)

संबंधित बातम्या : 

धुळ्यात बनावट दारुचा मोठा कारखाना उद्ध्वस्त, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई विमानतळावर तब्बल 18 कोटींचे कोकेन जप्त, आफ्रिकेतील तस्कराला बेड्या; महिन्याभरातील दुसरी मोठी कारवाई

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.