दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत

या व्यपाऱ्याच्या गर्लफ्रेंडने आई आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याचं उघड झालं.

दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 1:49 AM

नवी दिल्ली : आदर्श नगर परिसरात एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Delhi Boyfriend Murder). या व्यपाऱ्याच्या गर्लफ्रेंडने आई आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर या तिघांनी प्रियकराच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस राजधानी गाडीतून गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे (Delhi Boyfriend Murder).

मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याचं नाव नीरज गुप्ता आहे. तो मॉडल टाऊन येथे राहात होता. त्याचा करोल बागमध्ये व्यापार होता. त्याचं ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. नीरज यांच्या पत्नीने गेल्या 14 नोव्हेंबरला ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या बेपत्ता असण्यामागे फैजल नावाच्या महिलेचा हात असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. फैजल ही नीरजच्या ऑफिमध्ये काम करायची.

पोलिसांनी जेव्हा फैजलची चौकशी केली तेव्हा तिने नकार दिला. मात्र, तिच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच फैजलने पोलिसांसमोर सर्व कबुल केलं.

फैजल आणि नीरजमध्ये यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, फैजलच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. जुबेर नावाच्या व्यक्तीशी तिचा साखरपुडाही झाला. जुबेर हा राजधानी ट्रेनच्या पँट्रीमध्ये काम करतो. हे नीरज यांना आवडलं नाही. नीरज यांनी 12 नोव्हेंबरला रागाच्या भरात फैजलच्या घरी जावून तिला मारहाण केली. यादरम्यान, तिची आई आणि जुबेर तिथेच उपस्थित होता. त्यानंतर या तिघांनी मिळून नीरजची हत्या केली (Delhi Boyfriend Murder).

मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातच्या भरुचमध्ये फेकले

हत्या केल्यानंतर फैजलने जुबेरसोबत नीरजच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते बॅगमध्ये भरले. जुबेर ते निजामुद्दीन स्टेशनला घेवून गेला. तिथून गोवा जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधील ट्रेनच्या पँट्रीमध्ये ठेवून मृतदेहाला रस्त्यात गुजरातच्या भरुचमध्ये फेकून दिलं.

पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली वीट आणि चाकू हस्तगत करण्यात आले आहेत. तर मृतदेहाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झालं आहे.

Delhi Boyfriend Murder

संबंधित बातम्या :

मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घरातून गायब झालेल्या तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्येची शक्यता; शहापूर हादरले

परस्त्रीचा आलेला फोन बायकोने उचलला, रागात पतीने डोक्यात घातला पहार

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.