हृतिक रोशनवरील प्रेमामुळे पत्नीची हत्या, पतीचा गळफास
न्यूयॉर्कमध्ये हृतिकची चाहती असल्याने एका महिलेचा तिच्याच पतीने गळा आवळून खून केला

न्यूयॉर्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचे अनेक चाहते आहेत (Hritik Roshan Fans). देशातच नाही तर विदेशातही हृतिकचे अनेक फॅन्स पाहायला मिळतात. तरुणांमध्येतर त्याचं अतिशय क्रेझ आहे. त्याचा फॅन असल्याने कोणाला कधी आपला जीव गमवावा लागेल असा हृतिकनेही कधी विचार केला नसेल (Wife Crush on Hritik Roshan). मात्र, न्यूयॉर्कमध्ये हृतिकची चाहती असल्याने एका महिलेचा तिच्याच पतीने गळा आवळून खून केला (Man Killed Wife).
डेली मेलच्या वृत्तानुसार, 33 वर्षाच्या दिनेश्वर बुद्धिदत याने त्याच्या 27 वर्षीय पत्नी डोन डॉजॉएची गळा आवळून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (8 नोव्हेंबर) घडली. डॉजॉएची हत्या केल्यानंतर दिनेश्वरनेही झाडाला लटकून आत्महत्या केली.
दिनेश्वर बुद्धिदत ही त्याच्या अपमानास्पद आणि कंट्रोलिंग वागणुकीसाठी ओळखला जायचा. त्याची पत्नी डॉजॉए ही एक बारटेंडर होती. डॉजॉए, दिनेश्वरचं ऐकत नव्हती, त्यामुळे त्याने तिची हत्या केल्याची माहिती आहे. दिनेश्वर याच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. ऑगस्टमध्ये घडलेल्या एका प्रकरणावर येत्या बुधवारी (13 नोव्हेंबर) शिक्षा सुणावली जाणार होती. मात्र. त्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी दिनेश्वरने त्याच्या पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली, असं डेली मेलच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
डॉजॉएला हृतिक रोशनचे सिनेमे पाहायला खूप आवडायचं. ती नेहमी हृतिकची गाणीही ऐकायची. दिनेश्वर हा नेहमी डॉजॉएवर हृतिक रोशनमुळे चिडायचा. डॉजॉएला हृतिक आवडतो हे त्याला आवडत नव्हते. त्यावरुन तो डॉजॉएशी वाईट वागायचा. तिला हृतिकचे सिनेमे पाहाण्यास मनाई करायचा. मात्र, डॉजॉए त्याचं ऐकायची नाही, असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.