लोकल प्रवासासाठी अवघ्या 500 रुपयात फेक क्यूआर कोड पास, एकाला अटक

ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. (One person arrested for Fake QR Code Pass)

लोकल प्रवासासाठी अवघ्या 500 रुपयात फेक क्यूआर कोड पास, एकाला अटक
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 3:24 PM

मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ज्या व्यक्तींना त्याने पास बनवून दिले आहेत, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. खोटे क्यूआर कोड पास बनवल्याप्रकरणी मुंबईत एकूण सहा गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अनिश राठोड असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो हे सर्व क्यूआर कोड बनवतं होता. (One person arrested for Fake QR Code Pass For Mumbai Local Travel)

अनिश राठोड हा मुंबईतील अँन्टॉप हिल परिसरात राहतो. तिथूनच तो लोकांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देत होता. ज्यांच्या मोबदल्यात तो त्यांच्याकडून 500 ते 1000 रुपये घेत होता. नुकतंच वडाळा जीआरपी पोलिसांनी दोन व्यक्तींना खोटे क्यू आर पास असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतलं होतं. त्या दोघांनी अनिशचे नाव सांगत त्यांच्याकडून क्यूआर कोड बनवले होते.

यानंतर वडाळा रेल्वे पोलिसांनी अनिश राठोडच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून कॉम्प्युटर आणि इतर साहित्य जप्त करुन त्याला अटक केली. ज्या लोकांनी त्यांच्याकडून क्यूआर कोड पास बनवून घेतले होते. ते छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे कामगार होते.

कोव्हिड संकट पाहता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी 15 जूनपासून लोकल ट्रेन सुरू करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये, म्हणून महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम सुरू केली होती. याचाच फायदा घेण्यासाठी बोगस क्यूआर कोड बनवणारी टोळी सक्रिय झाली. दरम्यान अनिश राठोडने आतापर्यंत जवळपास 400 ते 500 फेक क्यूआर कोड लोकांना बनवून दिले आहेत.

याप्रकरणी रेल्वे पोलीस सखोल तपास करत आहे. हे रॅकेट अजून किती खोलपर्यंत पसरले आहे याचा शोध घेत आहे. जेणेकरून या रॅकेटला उद्ध्वस्त केलं जाऊ शकेल. अनिश राठोडवर इतर ठिकाणीसुद्धा गुन्हे दाखल असून पोलीस या सर्वांची माहिती घेत आहेत. मात्र लोकांनी अनिशसारख्या भामट्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.(One person arrested for Fake QR Code Pass For Mumbai Local Travel)

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.