हनुवटीखाली झाडलेली गोळी डोक्यातून आरपार, हिंगोलीत आयुध विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

जितेंद्र गोकूळदास साळी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. साळी यांनी शस्त्र कार्यशाळेत नुवटीजवळ खालच्या भागाजवळ बंदुक लावून गोळी झाडली.

हनुवटीखाली झाडलेली गोळी डोक्यातून आरपार, हिंगोलीत आयुध विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 11:30 PM

हिंगोली : हिंगोलीत आयुध विभागात कर्मचाऱ्याने स्वत:वर (Ordnance Department Employee Commit Suicide) गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. जितेंद्र गोकूळदास साळी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. जितेंद्र गोकूळदास साळी यांनी शस्त्र कार्यशाळेत नुवटीजवळ खालच्या भागाजवळ बंदुक लावून गोळी झाडली. त्यामध्ये गोळी डोक्यातून आरपार झाली आणि जितेंद्र साळी यांचा (Ordnance Department Employee Commit Suicide) मृत्यू झाला.

हिंगोली येथील आयुध विभागातील शस्त्र दुरुस्तीचे काम करणारे पोना जितेंद्र गोकूळदास साळी हे 2001 मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते. सध्या ते पोलीस मुख्यालयातील आयुध विभागात शस्त्र दुरुस्तीचे काम पाहात होते. रोज चार जणांना या विभागात कामाला बोलावले जाते. सकाळच्या सत्रात काम केल्यानंतर ते घरी गेले. पुन्हा दुपारी 4 वाजता त्यांची ड्युटी होती. मात्र, ते 3 वाजताच या विभागात दाखल झाले. शस्त्र कार्यशाळेत ते एकटेच असताना त्यांनी हनुवटीजवळ खालच्या भागाजवळ बंदुक लावून गोळी झाडल्याने ती डोक्यातून आरपार गेली.

बंदुकीच्या फायरचा आवाज ऐकताच आजूबाजूचे कर्मचारी घटनास्थळी धावले. तेव्हा हा प्रकार समोर आला (Ordnance Department Employee Commit Suicide). साळी यांचा जागीच मृत्यू झाला होता. याठिकाणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प. उपाधीक्षक आश्विनी जगताप यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस ठाण्याचे केनेकर आणि इतरांनी घटनास्थळी पंचनामा करुन प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.

जितेंद्र साळी यांना गायकीचा छंद होता. ते मूळचे कळमनुरी तालुक्यातील असले तरी, येथील नवीन पोलीस वसाहतीत कुटूंबियासह वास्तव्याला होते. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे त्यांचे कुटूंब आहे.

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

साळी यांच्या आत्महत्येमागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून साळी नैराश्यात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत (Ordnance Department Employee Commit Suicide).

संबंधित बातम्या :

बाळा, पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, शेतकरी बापाचा शब्द टाळला, शाळकरी मुलाची आत्महत्या

सुशांतच्या घरी विशेष गॉगल होता, प्रोफाईल मॅनेजरची माहिती, श्रुती मोदीचा पोलिसांत जबाब

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.