ग्रामविकास विभागात 28 हजार जागांच्या नोकरभरतीची खोटी जाहिरात, पुण्यात बोगस वेबसाईटवर गुन्हा
या भामट्यांनी ग्रामविकास विभागाचं संकेतस्थळ असल्याचं भासवून भरतीची खोटी जाहिरात दिली. तब्बल 28 हजार 384 जागांची जाहिरात दिली होती.
पुणे : देशात आणि राज्यात सतत कोरोना बाधितांचा (Pune Fraud) आकडा वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात व्यस्त आहे. हीच संधी साधत काही भामट्यांनी नोकर भरतीची खोटी जाहिरात दिली. सरकारची आणि तरुणांची फसवणूक (Pune Fraud) करण्याचा प्रयत्न केला.
या भामट्यांनी ग्रामविकास विभागाचं संकेतस्थळ असल्याचं भासवून भरतीची खोटी जाहिरात दिली. तब्बल 28 हजार 384 जागांची जाहिरात दिली होती. या प्रकरणी पुणे झेडपी प्रशासनाच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात https://t.co/6j2BiUQvBU
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020
यांनी www.egrampachayat.com या संकेत स्थळावर ई-ग्रामपंचायत राज्यस्तरीय सरळ सेवा निवड समिती पुण्याची जाहिरात दिली. प्रकल्प व्यवस्थापक ई-ग्रामपंचायत प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. या स्पर्धा परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने 1 ते 20 एप्रिल या कालावधीत अर्ज मागवले होते. परीक्षा मे महिन्यात होणार होती (Pune Fraud).
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग सादरीकरण एप्रिल 2020, असं होम पेज तयार केलं होतं. या पेजवर संकेतस्थळाचा उल्लेख करुन सरकारची भरती असल्याचं भासवलं होतं. पात्र स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून जिल्हा अधीक्षक (जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्तर) 34 पदांची जाहिरात दिली. या पदासाठी 17 ते 22 हजार वेतनाचाा जाहिरातीत उल्लेख केला होता. तालुका समन्वयकची (तालुका पंचायत स्तर) 350 जागांची जाहिरात असून पगार 14 ते 19 हजार होता. तर ग्राम संयोजकच्या ( ग्राम पंचायत स्तर) तब्बल 28 हजार जागांची जाहिरात दिली. या पदांकरिता सात ते 12 हजार पगाराच जाहिरात उल्लेख केला होता.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त संकेतस्थळावर आहे. अर्ज शुल्क म्हणून पाचशे रुपये ऑनलाईन भरायचे, अशी खोटी जाहिरात देऊन तरुणांची दिशाभूल केली होती. यासंदर्भात व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर साईट लोड करुन जाहिरात (Pune Fraud) दिली होती.
संबंधित बातम्या :
पुणे पोलिसांचा जालीम इलाज; दोन दिवसांसाठी भाजीपाला-किराणाही बंद; केवळ दूध मिळणार
तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात
पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 800 पार, रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’