अहमदनगरमध्ये हैदोस, बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडितेच्या मुलीला पेटवलं

बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने अहमदनगरमध्ये एका आरोपीने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना घडली आहे (Rape Victim daughter set on fire in Ahmednagar).

अहमदनगरमध्ये हैदोस, बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडितेच्या मुलीला पेटवलं
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 5:54 PM

अहमदनगर : बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने अहमदनगरमध्ये एका आरोपीने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना घडली आहे (Rape Victim daughter set on fire in Ahmednagar). अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. राजाराम तरटे आणि अमोल तरटे (पारनेर) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींनी थेट पीडितेच्या मुलीला जाळल्याने त्यांना कायद्याचा धाक आहे की नाही? असाच प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आरोपींनी पारनेरमधील आदिवासी समाजातील 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपींनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यास सांगितले. पीडितेने त्यांची मागणी मान्य न केल्याने आरोपींनी थेट अत्याचारित पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, “आम्ही आमच्या कोपीमध्ये जेवण करत होतो. त्यावेळी आरोपी मोटार सायकलवरुन आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी तू बलात्काराची केस मागे घे, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी आमची मुलगी बाहेर आली असता आरोपीने त्याच्या हातातील पेट्रोल फेकले. त्यानंतर त्यांनी मुलीचे अंगावर काडी पेटवून फेकली. त्यामुळे मुलीच्या अंगावरील फ्रॉक जळून भाजून गंभीर जखमी झाली.”

या घटनेनंतर आरोपींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हेही वाचा :

सख्खा भाऊच ठरला वैरी, लहान भावाने मोठ्या भावाला पेट्रोल टाकून पेटवलं

जालन्यात 14 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार, नराधमास जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

Rape Victim daughter set on fire in Ahmednagar

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.