मोबाईल शॉपीवर दरोडा; 16 लाखांचे मोबाईल लंपास, रिकामे बॉक्स मात्र दुकानातच

इचलकरंजी येथील गायत्री मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी विविध कंपन्यांचे तब्बल 16 लाख 66 हजार 323 रुपये किंमतीचे 107 मोबाईल लंपास केले आहेत.

मोबाईल शॉपीवर दरोडा; 16 लाखांचे मोबाईल लंपास, रिकामे बॉक्स मात्र दुकानातच
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 11:15 PM

कोल्हापूर : इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गायत्री शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी विविध कंपन्यांचे तब्बल 16 लाख 66 हजार 323 रुपये किंमतीचे 107 मोबाईल लंपास केले आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे 4.45 च्या सुमारास घडली. याबाबत रवी जनार्दन हजारे (34) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Robbery at a mobile shop in Ichalkaranji, 107 mobiles worth Rs 16 lakh stolen)

याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रवी हजारे यांच्या मालकीचे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बँक ऑफ महाराष्ट्र लगतच गायत्री शॉपी नावाचे मोबाईल दुकान आहे. हजारे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री दुकान बंद करुन गेले होते.

सकाळी दहा वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असताना दुकानाचे शटर उचकटल्याचे आणि दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप कापून व शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला आणि दुकानात विक्रीसाठी ठेवलेले विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल लांबवले.

त्यामध्ये सॅमसंग कंपनीचे 4 लाख 68 हजार 614 रुपये किंमतीचे 23, रियलमी कंपनीचे 76 हजार 493 रुपये किंमतीचे 8, वनप्लस कंपनीचे 54 हजार 574 रुपये किंमतीचे 2, अॅप्पल कंपनीचे 1 लाख 36 हजार 224 रुपये किंमतीचे 2, विवो कंपनीचे 3 लाख 69 हजार 526 रुपयांचे 35 आणि ओप्पो कंपनीचे 5 लाख 60 हजार 892 रुपये किंमतीचे 37 मोबाईल असे 16 लाख 66 हजार 323 रुपयांचे तब्बल 107 मोबाईल आहेत. चोरांनी केवळ मोबाईल नेऊन त्याचे रिकामे बॉक्स मात्र दुकानातच टाकले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दोन चोर दुकानात चोरी करताना दिसत आहेत. त्यांचे काही साथीदारही असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ चोर दुकानात होते. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांना काही ठसेही मिळाले आहेत. त्याचबरोबर चोरांचा माग काढण्यासाठी स्टेला श्‍वानपथकही आणण्यात आले होते. ते दुकानापासून छत्रपती शिवाजी पुतळा आणि सिटी इन हॉटेल या परिसरातच घुटमळत राहिले. त्यामुळे चोरांनी चोरीनंतर पलायन करण्यासाठी एखाद्या वाहनाचा वापर केला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

संबंधित बातम्या

नागपुरात 41 लाखांची ऑनलाईन फसवणूक, चार नायजेरियनसह एका भारतीयाला अटक

Phone Pe आणि PayTm च्या मदतीने फसवणूक, चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले

(Robbery at a mobile shop in Ichalkaranji, 107 mobiles worth Rs 16 lakh stolen)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.