विक्रोळीत भांडणातून सुरक्षा रक्षकाला बांबूने जबर मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
साळवे आणि राजू गायकवाड यांच्यामध्ये भांडण झालं. यामध्ये राजू गायकवाड आणि साथीदारांनी साळवे यांना बांबूने मारहाण केली.
मुंबई : विक्रोळीत 57 वर्षीय व्यक्तीचा बांबूने मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे (Security Guard Murder). विक्रोळी पुर्वेला पँथर नगर परिसरात रहात असलेल्या अंबादास साळवे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. साळवे आणि राजू गायकवाड यांच्यामध्ये भांडण झालं. यामध्ये राजू गायकवाड आणि साथीदारांनी साळवे यांना बांबूने मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला (Security Guard Murder).
29 ऑक्टोबर रोजी दुपारच्या तीनच्या सुमारास अंबादास साळवे हे आपली सुरक्षा रक्षकाचे काम करुन घरी जात असताना राजू गायकवाड आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी इमारत क्रमांक 156 समोरील अंबादास साळवे यांचा रस्ता आडवला. त्यांना हात, पायावर आणि पोटात बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
याची माहिती त्यांच्या लहान मुलाला कळातच त्यांना तात्काळ जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्रथम उपचार रुग्णालयात सुरु करण्यात आले. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास उपचारा दरम्यान डॉक्टरांनी अंबादास साळवे यांना मृत्यू घोषित केले. त्यामुळे अंबादास साळवे यांना पाहण्यासाठी रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली. या प्रकरणातील पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहे.
जुलैमध्ये मैत्री, ऑगस्टमध्ये लव्ह मॅरेज, ऑक्टोबरमध्ये हत्या https://t.co/KYqjlRcJq6 #Indore #Murder #AnshuSharma
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2020
Security Guard Murder
संबंधित बातम्या :