Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मास्क घालून चोरी, फेसबुक पोस्टमुळे चोरट्याला अटक

चोरट्याने मास्क घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. पोलीस शोधात होते. मात्र, डान्स अकादमीमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज डान्स टिचरने व्हायरल केले.

मास्क घालून चोरी, फेसबुक पोस्टमुळे चोरट्याला अटक
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 4:38 PM

डोंबिवली : लॉकडाऊनच्या काळात डोंबिवली आणि कल्याणमध्ये कार्यालये तोडून लॅपटॉप चोरीच्या (Thief Arrested Due To Facebook Post) घटनांमध्ये वाढ झाली होती. अज्ञात व्यक्तीकडून होत असलेल्या या गुन्ह्यामुळे पोलीसही हादरुन गेले होते. मात्र, एका छोट्याश्या क्ल्यूमुळे अखेर पोलिसांना या आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं असून त्याला बेड्या घालण्यात आल्या आहेत (Thief Arrested Due To Facebook Post).

चोरट्याने मास्क घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. पोलीसही त्याचा शोध घेऊन चक्रावले होते. मात्र, डान्स अकादमीमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज डान्स टिचरने व्हायरल केले. या व्हायरल पोस्टमुळे चोरटा पोलिसांच्या हाती लागला. याच्याकडून 10 लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा चोरटा वांगणीहून पहाटेच्या ट्रेनने डोंबिवलीत यायचा. लॉकडाऊनच्या काळात पहाटे चोरी करून निघून जायचा.

या चोरट्याचा चोरी करतानाचा एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हातात होता. मात्र, चोरट्याने मास्क घातल्याने त्याची ओळख स्पष्टपणे पटत नव्हती. या दरम्यान, डान्स अकादमी चालविणारे योगेश पाटकर त्यांच्या अकादमीमधून ज्या चोरट्याने प्रोजेक्टर चोरी केला होता. त्याचा सीसीटीव्ही फुटेज कल्याण-डोंबिवलीतील त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपवर शेअर केला आणि फेसबुक पोस्टही टाकली. या फेसबुक पोस्टवरुन चोरटा पोलिसांच्या हाती लागला (Thief Arrested Due To Facebook Post).

ती फेसबुक पोस्ट एका तरुणाने बघितली. हा तरुण योगेश पाटकर यांच्या संपर्कात आला. ज्या व्यक्तीची पोस्ट तुम्ही टाकली आहे. तो माझा मित्र आहे. त्याला मी चांगलेच ओळखतो, असं त्यांनी योगेश पाटकर यांना सांगितले. पाटकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. चोराचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला पाटकर यांनी दहा हजार रुपये बक्षिस देणार असल्याचं सांगितलं होते. त्यानुसार, पाटकर त्या व्यक्तिला 10 हजार रुपये बक्षिस म्हणून देणार आहेत.

कल्याण क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी नितीन मुकदूम यांनी तातडीने ज्या सापळा रचून चोरट्याला ताब्यात घेतलं. रोशन जाधव असं या तरुणाचे नाव असून तो डिसेंबर 2019 मध्ये जेलमधून सुटून आला होता. वांगणीला राहणारा रोशन हा ट्रेन सुरु झाल्यावर दररोज पहाटे पाच वाजताच्या सुमारास डोंबिवली गाठायचा. सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान चोरी करुन निघून जायचा. त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. दहा लॅपटॉप आणि दोन प्रोजेक्टर हस्तगत करण्यात आले आहे. आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Thief Arrested Due To Facebook Post

संबंधित बातम्या :

नितीन नांदगावकर यांच्या नावावर खंडणी, घराचा ताबा मिळवूण देण्याच्या नावाखाली दीड लाखांना गंडा

अडीच कोटी रुपयांचे सोने बनावट निघाले; अहमदनगर जिल्हा बँकेत सोनेतारण कर्ज घोटाळा

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.