नागपुरात दोन दिवसात तीन हत्या, शहरात खळबळ

नागपूर शहरात मागील 48 तासांत हत्येच्या तीन घटना घडल्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागपुरात दोन दिवसात तीन हत्या, शहरात खळबळ
Nagpur Two Murder
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:48 PM

नागपूर : हत्येच्या घटनांनी राज्याची उपराजधानी हादरली आहे. नागपूर शहरात गेल्या 48 तासांत हत्येच्या तीन घटना घडल्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील एमआयडीसी, हिंगणा आणि प्रतापनगर या भागात हत्येच्या घटना घडल्या असून त्याची कारणं क्षुल्लक असली तरी यामुळे नागपुरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Three murders in two days in Nagpur)

दरम्यान, पोलिसांनी हत्येच्या तीन गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमधील आरोपींना अटक केली आहे. यातील पहिली घटना नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा नगर परिसरात घडली आहे. येथील एका अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आली आहे. या प्रकरणात मद्यधुंत अवस्थेत असलेल्या व्यक्तीला विचारपूस केल्याच्या क्षुल्लक कारणावरुन हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

हत्येची दुसरी घटना हिंगणा परिसरातील वेळा (हरिश्चंद्र) शिवारात घडली आहे. वेळा परिसरातील एका 23 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे. विनीत सुरेश बन्सोड असे मृतकाचे नाव आहे. दगडाने ठेचून विनीतचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. ही हत्यादेखील दारू पिण्याच्या कारणावरून झाल्याचे समोर आले आहे.

हत्येची तिसरी घटना नागपुरातील प्रताप नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत घरमालक असलेल्या अनिल पालकर यांचे भाडे वाढवण्याच्या कारणावरुन दोन भाडेकरुंसोबत भांडण झाले आणि त्यातून ही हत्या घडून आली असल्याची माहिती समोर आली आहे.

अतिशय क्षुल्लक कारणांवरुन नागपुरात गेल्या 48 तासांत हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. हत्येच्या या घटनांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

संबंधित बातम्या

दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्याची हजार रुपयांसाठी हत्या, चोरट्याला अटक

शौचास गेलेल्या महिलेवर हल्ला करुन डोळा काढणाऱ्या नराधमाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कामगिरी

(Three murders in two days in Nagpur)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.