वसईत कोरोनाच्या नावावर औषध विक्री, 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत (Vasai Doctor fraud with patient) आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वसईत कोरोनाच्या नावावर औषध विक्री, 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 9:55 AM

वसई : देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत (Vasai Doctor fraud with patient) आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचदरम्यान वसईतील दोन डॉक्टर नागरिकांच्या भीतीचा फायदा घेत फसवणूक करत आहेत. डॉक्टरांनी आमच्याकडे कोरोनावर औषध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. सरवर खान आणि डॉ. सुभाषचंद्र एल. यादव अशी या डॉक्टरांची (Vasai Doctor fraud with patient) नावं आहेत.

नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे सध्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कोरोनाविषयी अफवा पसरवण्यास प्रतिबंध केला आहे. त्यानुसार वसईतील डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.

डॉ. सरवर खान यांनी ‘आमच्याकडे कोरोना विषाणूवर औषध उपलब्ध आहे’, असा बोर्ड लावला होता. तर डॉ. सुभाषचंद्र यादव यांनीही ‘आमच्याकडे कोरोना विषाणूवर औषध मिळते’, असा बोर्ड लावला होता. एक डोस 100 रुपयाला अशी पत्रकं भिंतींवर चिटकवले होते. या दोन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूवर आमच्या येथे उपचार केले जातील असा दावा आतापर्यंत अनेकांनी केला आहे. उत्तर प्रदेशातही एक भोंदू बाबा 11 रुपयाचे लॉकेट लोकांना विकत होता आणि हे लॉकेट कोरोनावर उपचार करते, असा दावा करत होता. तर एका फर्निचर कंपनीने आमच्या गादीवर झोपा आणि कोरोना पळवा असा दावा केला होता. या दोघांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

संबधित बातम्या :  

Corona Effect | पुण्यात अमृततुल्य चहाची दुकान दोन दिवस बंद, दारु विक्रीवरही 31 मार्चपर्यंत बंदी

11 रुपयांचे लॉकेट विकून फसवणूक, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कोरोना बाबाला अटक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.