मास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं, गावगुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यालाही मारहाण
मास्क घातला नसल्यामुळे पेट्रोल नाकारल्याने 10 ते 15 गावगुंडांनी वसईत पेट्रोल पंपावर हल्ला केला आहे.
वसई : मास्क घातला नसल्यामुळे पेट्रोल नाकारल्याने 10 ते 15 गावगुंडांनी वसईत पेट्रोल पंपावर हल्ला (Guns Attack On Petrol Pump) केला आहे. पोलिसांच्या समोरच जमावाकडून पेट्रोल पंप मालक, महिला कर्मचारी यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पेट्रोलची मशीन, कॅबिनच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली आहे (Guns Attack On Petrol Pump).
या हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल अर्धा तास सर्व राडा करुन हल्लेखोर फरार झाले. वसईच्या माणिकपूर येथील बेसीन पेट्रोल सप्लाय कंपनी या पेट्रोल पंपावर काल (18 सप्टेंबर) सायंकाळी पावणे 7 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
वसईच्या माणिकपूर येथील बेसीन पेट्रोल सप्लाय कंपनी या पेट्रोल पंपावर सायंकाळी पावणे 7 च्या सुमारास दोन जण बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी मास्क न घातल्याने पेट्रोल कर्मचाऱ्यांनी पेट्रोल बाईकमध्ये भरण्यास मनाई केली. त्यानंतर बाईकवाल्यांनी बाईक तेथेच ठेवून, पेट्रोल मालकाशीही हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी जवळपास 20 ते 30 जणांचा जमाव घेवून आले (Guns Attack On Petrol Pump).
या जमावांने पोलिसांसमोर महिला, वृध्द पेट्रोल कर्मचारी, मालक यांना मारहाण केली. आग विझवण्याच्या बाटल्या, वीट फेकून मारहाण केली. कार्यालयाची, पेट्रोल पंपाचीही तोडफोड केली आणि हे सर्व नवघर माणिकपूर पोलिसांसमोरच झालं. त्यानंतर त्यांना अटक न करता पोलिसांनी हाकलून लावलं. सध्या नवघर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेकडून पर्दाफाशhttps://t.co/xYK1ZNizHm #Thane #Corona #MNS @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2020
Guns Attack On Petrol Pump
संबंधित बातम्या :