प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, तरुणीच्या हातावरील नावामुळे मारेकऱ्याचा शोध
वर्ध्यात क्षुल्लक गोष्टीवरुन झालेल्या वादातून तरुणाने अल्पवयीन प्रेयसीची हत्या केली. तरुणीच्या हातावरील नावावरुन पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेतला
वर्धा : अल्पवयीन प्रेयसीची प्रियकराने पोट आणि गळ्यावर वार करुन हत्या (Wardha Boyfriend Kills Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात उघडकीस आली आहे. दुसऱ्या तरुणाशी बोलल्यावरुन झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. मुलीच्या हातावरील नाव पाहिल्यानंतर (Wardha Boyfriend Kills Girlfriend) पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा झाला.
हिंगणघाट शहरात रिमडोह येथील लेआऊटमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी जमा झाली होती. धारदार शस्त्राने गळा चिरुन तरुणीची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. तरुणी अल्पवयीन असून हिंगणघाट शहरातील रहिवासी आहे.
हिंगणघाट शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रिमडोह शिवारात द्वारका नगरीच्या परिसरात रविवारी हा प्रकार घडला. मुलीच्या हातावर असलेलं नाव पाहून पोलिसांनी शोध घेतला असता ती हिंगणघाट शहरातील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं.
अमेरिकावारी टाळण्यासाठी पुण्यात महिलेकडून पोटच्या मुलीची हत्या
पोलिसांनी कुटुंबियांकडे चौकशी केली, तेव्हा रविवारी दुपारी संबंधित तरुणी मामाकडे जात असल्याचं सांगून निघाल्याचं समजलं. ती बराच वेळ घरी न आल्याने शोधाशोध केली. यावेळी पंकज तडस नावाच्या तरुणीच्या मित्राचं नाव समोर आलं.
मयत तरुणी दुसऱ्या मित्राशी बोलताना दिसल्यामुळे पंकजचा तिळपापड झाला. काय बोलत होतीस, हे विचारण्यासाठी त्याने तिला रिमडोह येथील निर्जनस्थळी बोलावलं. यावेळी वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने युवतीची हत्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिली.
नांदगाव येथील 19 वर्षीय पंकज राजू तडस याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याने हत्येची कबुली दिली.
गेल्या काही दिवसात पुणे आणि आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. गेल्याच आठवड्यात अल्पवयीन मुलीची लॉजमध्ये नेऊन हत्या केलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. आरोपी तरुणाचा शोध घेताना पोलिसांना त्याचा मृतदेह इंद्रायणी नदीत हाती लागला होता.
संबंधित बातम्या :
अगोदर प्रेयसीची लॉजवर नेऊन हत्या, नंतर तरुणाची इंद्रायणी नदीत आत्महत्या