लासलगावमध्ये ‘हिंगणघाट’ची पुनरावृत्ती, प्रेमप्रकरणातून विधवेला जिवंत पेटवलं
लासलगाव येथील एसटी स्टँडवर प्रेमप्रकरणाच्या वादातून विधवा महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात (Set on fire women lasalgaon) आले.
नाशिक : लासलगाव येथील एसटी स्टँडवर प्रेमप्रकरणाच्या वादातून विधवा महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात (Set on fire women lasalgaon) आले. पीडित महिला 50 टक्के भाजली असून तिच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगणघाटची पुनरावृत्ती लासलगाव येथे घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी रामेश्वर भागवतला ताब्यात घेतले असून अधिक (Set on fire women lasalgaon) चौकशी सुरु आहे.
लासलगावजवळ असलेल्या पिंपळगाव येथील विधवा महिलेचे तिच्या पतीच्या निधनानंतर रामेश्वरसोबत प्रेम संबंध होते. ज्या मुलासोबत प्रेमसंबंध झाले होते त्या युवकाचा साखरपुडा झाला. यानंतर रागाच्या भरात येऊन पीडितेने त्या तरुणाचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तरुणाने थेट एसटी स्टँडवर येऊन विधवा महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले.
विशेष म्हणजे पीडितेने लासलगावमधील एका मंदिरात आरोपी रामेश्वरसोबत एक महिन्यापूर्वी लग्न केले, असं पीडितेने सांगितले आहे. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या घटनेत विधवा महिला 50 टक्के भाजली असून तिला लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पण प्राथमिक उपचार करुन तिला नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून यामध्ये अजून कुणाकुणाचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.