उत्तर प्रदेश – काँग्रेस (congress) पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी मुख्यमंत्री पदी माझ्याशी दुसरा चेहरा कुणीचं नसल्याचे म्हणाल्यानंतर युपीच्या राजकारण (up politics) अधिक रंग चढला होता. परंतु मुख्यमंत्री कोणाला करायचं हे माझा पक्ष (party) ठरवेल. तसेच ते आमच्या पक्षाचं मतं असतं. मला वारंवार मुख्यमंत्री (minister) कोण हा प्रश्न विचारल्याने मी चिडले होते. त्यामुळे माझ्याकडून असं वक्तव्य गेल्याची कबूली प्रियांका गांधी यांनी दिली.
तसेच युपीच्या राजकारणात काँग्रेसकडून तरूणांवरती फोकस केल्याने तिथं तरूणांचं अधिक मतदान होईल अशी अपेक्षा सुध्दा प्रियांका गांधी यांनी बोलावून दाखवली आहे. तसेच विधानसभेची होणारी निवडणुक आम्ही पुर्ण ताकतीनिशी लढत असून यामध्ये बेरोजगारी, महागाई, महिलांची सुरक्षा तसेच जे गंभीर प्रश्न युपीत आहे अशा सर्व प्रश्नांच्या जोरावर आम्ही निवडणुक लढवत असल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले आहे.
भाजपने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं – प्रियांका गांधी
‘या सरकारने बेरोजगार तरुणांसाठी काय केले? निवडणुका आल्या की 25 लाख नोकऱ्या देऊ असे सांगितले जाते, रोजगार कुठून येणार याचा उलगडा कधी झाला आहे का ? 20 लाख नोकऱ्या देऊ, असे आम्ही म्हणालो, हवेत नाही म्हटले. आम्ही संपूर्ण जाहीरनामा समोर आणला आहे. ते उत्तर प्रदेशात ५ वर्षांपासून सरकारमध्ये आहेत, त्यांना विमानतळ, महामार्गाचे उद्घाटन आणि नवीन उद्योग उभारण्यासाठी शेवटचा महिनाच मिळाला का मिळाला. त्याआधी त्यांच्याकडे वेळ नव्हता का? निवडणुकीच्या महिनाभर आधी तुम्ही सर्वजण घोषणा करत आहात, घोषणा करायच्या असतील तर ठोस पद्धतीने करायला हव्या होत्या.
या दिवशी होणार मतदान
– उत्तर प्रदेश – 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्चपर्यंत सात टप्प्यात मतदान होणार
– उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार
– पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होईल
– मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीला आणि 3 मार्चला मतदान होईल
सर्व राज्यांचे निकाल 10 मार्चला जाहीर होतील