मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बीएस्सी नर्सिंग (B.Sc Nursing) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, मुदतवाढ मिळणार नसून 31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया (Admission process) राबवण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चत. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेशाची मुदत वाढविण्यात (Extension) यावी, अशी मागणी भारतीय नर्सिंग परिषदेकडे करण्यात आली होती.
31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार
भारतीय नर्सिंग परिषदेला या मागणीमध्ये काही तथ्य आढळले नाही आणि 31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयाच्या रिक्त जागा संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया आता संस्थास्तरावर 31 मार्चपर्यंत सुरू असेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना बीएस्सी नर्सिंगला प्रवेश घेण्यासाठी आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. संस्थास्तरावरील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक, जागांची माहिती सीईटी कक्षाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या
विद्यार्थ्यांना कुठल्या महाविद्यालयामध्ये किती जागा शिल्लक आहेत. हे जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देत माहिती मिळवता येईल. बीएस्सी नर्सिंग ही बारावीनंतर करता येते. मात्र, यासाठी सीईटी देणे अर्निवार्य आहे. सध्या विद्यार्थ्यांचा कल बीएस्सी नर्सिंगकडे जास्त आहे. कारण दरवर्षी बीएस्सी नर्सिंगच्या अनेक शासकीय जागा निघतात. त्याचप्रमाणे खासगी दवाखान्यांमध्ये देखील बीएस्सी नर्सिंग पात्र लोकांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पगारही चांगला दिला जातो.
संबंधित बातम्या :
HSC SSC Result : दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता, नेमकं कारण काय ?
Supreme Court : दिव्यांगांसाठी खुशखबर, दिव्यांगही IPSसाठी अर्ज करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय