CET-बारावीच्या 50-50 टक्के गुणांवर मिळणार प्रवेश! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

येत्या वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

CET-बारावीच्या 50-50 टक्के गुणांवर मिळणार प्रवेश! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय
CUET PG 2022Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 5:35 AM

मुंबई : सीईटी आणि बारावीच्या 50-50 टक्के गुणांवर पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना सीईटीसोबत बारावीच्या परीक्षेसाठीदेखील तेवढीच तयारी करावी लागले. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) घेतली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जाते. मात्र आता येत्या वर्षापासून सीईटीतल 50 टक्के आणि बारावीतील 50 ठक्के गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे. येत्या वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच येत्या वर्षापासून सीईटीचा निकाल 1 जुलै रोडी लागेल आणि 1 सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक सत्र सुरु होईल, अशा प्रकारचं नियोजन करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

का घेण्यात आला निर्णय?

बारावीच्या परीक्षेला फारसं महत्त्व न देता सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं. दरम्यान, बारावीचे गुणही प्रवेशासाठी आवश्यक असल्याचं म्हणत हा निर्णय घेतला गेल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.

बारावीनंतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून एकूण 16 प्रकारच्या सीईटी घेतल्या जातात. या सीईटी परीक्षांची संख्याही कमी केली जाईल, असंही उदय सामंत यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

बारावीच्या वर्गात विद्यार्थीच बसत नसल्याचं चित्र आहे. विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष हे सीईटींवर केंद्रीत झालंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटील्या समसमान वेटेज दिलं पाहिजं, असं ठरलं. त्यामुळे आता बारावी बोर्ड परीक्षेचे गुण आणि सीईटीचे मार्क असा प्रत्येकी पन्नास-पन्नास टक्के गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. तसंच जेईई मेनची परीक्षा दोन टप्प्यंत होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना मार्क्स स्कोअर करण्याची संधी मिळण्यासाठी पुन्हा एकदा सीईटीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जेईई आणि नीट परीक्षांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सीईटी परीक्षा ऑगस्ट होत असल्या, तरी त्यांचा निकाल परीक्षा झाल्याच्या दिवसापासून दहा दिवस जाहीर केला जाईल, अशी माहिती उदय मांत यांनी दिली आहे.

अत्यंत महत्त्वाचं

जे विद्यार्थी सीईटी परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पदवी शिक्षणसाठी प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांना सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना नवा नियम लागू असणार आहे. दरम्यान, MHT CET Exam 2022 च्या PCM ग्रूपची परीक्षा येत्या 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2022 दरम्यान, तर PCB ग्रूपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान, होईल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15,16 आणि 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. JEE आणि NEET सोबत MHT CET परीक्षेच्या तारखा ओव्हरलॅप होऊ नयेत, म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.