AICTE | गणित, भौतिकशास्त्रच्या शिक्षणाशिवाय इंजिनिअरिंगचं शिक्षण अपूर्ण : अनिल सहस्त्रबुद्धे

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र विषय महत्वाचे असल्याचं म्हटलं आहे.

AICTE | गणित, भौतिकशास्त्रच्या शिक्षणाशिवाय इंजिनिअरिंगचं शिक्षण अपूर्ण : अनिल सहस्त्रबुद्धे
अनिल सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, अेआयसीटीई
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 4:23 PM

मुंबई: अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे तीन विषय अनिवार्य नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE )अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र विषय महत्वाचे असल्याचं म्हटलं आहे. या तीन विषयांशिवाय कुणीच अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकत नाही, असं त्यांनी सांगतिलं. कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान आणि जीव तंत्रज्ञानशाखांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल केल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली. (AICTE president Anil Sahasrabudhe said Maths chemistry and Physics are important for engineering course)

अनिल सहस्त्रबुद्धे काय म्हणाले?

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आम्ही कधीच अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र नको असं म्हटल नाही. हे विषय महत्वाचे आहेत. या तीन विषयांशिवाय कुणीच अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकत नाही, असं त्यांनी सांगतिलं.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा विकास

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांविषयी जागरुकता निर्माण करण्याची गरज होती. इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाविषयी स्थिती स्पष्ट करणं गरजेचे होते. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमांमध्ये बदल करणं गरजेचे आहे.

शिक्षण क्षेत्रातून निर्णयाला विरोध

वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून AICTE ने हा निर्णय घेतला असला तरी याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होताना दिसत आहे. गणित हा विषय अभियांत्रिकीच्या सर्व विषयांचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केल होते.

नवे 14 विषय कोणते?

2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. यंदाच्या वर्षापासून अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता (entrepreneurship) या विषयांचा अंतर्भाव असेल.

संबंधित बातम्या:

चिंता मिटली! बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार

(AICTE president Anil Sahasrabudhe said Maths chemistry and Physics are important for engineering course)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.