प्रादेशिक भाषेतून इंजिनिअरिंगचं शिक्षण, मराठी भाषेतून किती विद्यार्थी शिकणार? आकडेवारी काय सांगते
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (AICTE) यंदापासून सुरू केलेल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाला देशात मराठी भाषेतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी भाषेनंतर सर्वात जास्त प्रवेश हे मराठीतून झाले असल्याची माहिती परिषदेने जाहीर केली आहे.
मुंबई: नव्या शिक्षण धोरणाच्या (NEP) वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जुलै महिन्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत अभियांत्रिकीचं शिक्षण भारतीय भाषांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर देशातील आठ राज्यातील भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरु करण्यात आलं. अभियांत्रिकीचं शिक्षण हिंदी, तामिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला या भाषांमध्ये सुरु करण्यात आलेलं आहे. इंग्रजी विषयाची भीती दूर करून देशातील प्रादेशिक भाषेतून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण या वर्षीपासून सुरु करण्यात आलं आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (AICTE) यंदापासून सुरू केलेल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाला देशात मराठी भाषेतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी भाषेनंतर सर्वात जास्त प्रवेश हे मराठीतून झाले असल्याची माहिती परिषदेने जाहीर केली आहे.
नव्या शिक्षण धोरणानुसार प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षण
इंग्रजी भाषेची भीती दूर करण्यासाठी मागील वर्षी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने यासाठी धोरण आणले होते. त्या धोरणानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून आठ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलगु, तामिळ, गुजराती, कानडी आणि मल्याळम या भाषांचा समावेश होता. यासाठी देशातील 19 महाविद्यालयांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याची तयारी दर्शविली होती. यानुसार शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये देशभरातील 1 हजार 230 जागांपैकी 255 जागा भरल्या आहेत.
कोणत्या भाषेतून किती प्रवेश
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं प्रादेशिक भाषांमधील प्रवेशांसाठी 1230 जागा निश्चित केल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत 255 जागा भरल्या गेल्या आहेत. यामध्ये हिंदी भाषेतून शिक्षण घेण्यासाठी 116, मराठी भाषेतून 60, तामिळमधून 50, बंगालीमधून 16 आणि तेलगुमधून 13 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला आहे. तर, कन्नड भाषेतून एकही प्रवेश झालेला नाही.
प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेण्याकडं कल कमी?
प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षण द्यायला सुरुवात करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम साहित्य उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांचा कल दिसून येत नसल्याचं स्पष्ट झालंय.
इतर बातम्या:
Nitin Gadkari : नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, नितीन गडकरी आक्रमक
AICTE started engineering education in Regional language how many students take admission in Marathi Medium