CBSE बोर्डाची मोठी कारवाई, देशभरातील 20 शाळांची मान्यता रद्द, महाराष्ट्रातील या आहेत दोन शाळा
शाळा संलग्नता आणि परीक्षा उपनियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी आणि निकषांनुसार या शाळा चालवल्या जात आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली. या आकस्मिक तपासणीत अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली
नवी दिल्ली : देशात सध्या CBSE बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यानच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सुमारे 20 शाळांची मान्यता CBSE बोर्डाने रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ठाणे आणि पुणे या जिल्ह्यातील प्रत्येकी एक शाळा आहे. एवढेच नव्हे तर चार शाळांचा दर्जाही बोर्डाने कमी केला आहे. CBSE नुसार काही शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. या काळात अनेक गैरप्रकार उघडकीस आले. या शाळांनी नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना डमी प्रवेश दिला आहे असे या तपासणीत उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
CBSE चे सचिव हिमांशू गुप्ता यांनी सोशल माध्यम X वर याची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बोर्डाने देशभरातील CBSE शाळांमध्ये आकस्मिक तपासणी केली. शाळा संलग्नता आणि परीक्षा उपनियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी आणि निकषांनुसार या शाळा चालवल्या जात आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली. या आकस्मिक तपासणीत अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली.
काही शाळा डमी विद्यार्थी आणि अपात्र विद्यार्थी सादर करून विविध गैरप्रकार करत असल्याचे आकस्मिक तपासणीत उघड झाले. उमेदवार आणि नोंदी व्यवस्थित ठेवण्यात आल्या नाहीत. सखोल चौकशीअंती मान्यता रद्द करून पुढील शाळांची पदोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मान्यता काढून घेण्यात आलेल्या शाळांची यादी
1. प्रिन्स यूसीएच माध्यमिक विद्यालय, सीकर
2. राजस्थान ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, जोधपूर
3. राजस्थान द्रोणाचार्य पब्लिक स्कूल, रायपूर, छत्तीसगड
4. विकॉन स्कूल, विधानसभा रोड, रायपूर
5. करतार पब्लिक स्कूल, कैथ्या, जम्मू आणि काश्मीर
6. राहुल इंटरनॅशनल स्कूल, ठाणे, महाराष्ट्र
7. पायोनियर पब्लिक स्कूल, पुणे, महाराष्ट्र
8. SAI RNS अकादमी, दिसपूर, गुवाहाटी, आसाम
9. सरदार पटेल पब्लिक स्कूल, मिसरोद हुजूर, भोपाळ, मध्यप्रदेश
10. लॉयल पब्लिक स्कूल, बुलंदशहर, उत्तर प्रदेश
11. ट्रिनिटी वर्ल्ड स्कूल, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश
12. क्रिसेंट कॉन्व्हेंट स्कूल, गाझीपूर, उत्तर प्रदेश
13. पीव्हीएस पब्लिक स्कूल, मलप्पुरम, केरळ
14. मदर तेरेसा मेमोरियल सेंट्रल स्कूल, तिरुवनंतपुरम, केरळ
15. ज्ञान आइन्स्टाईन इंटरनॅशनल स्कूल, डेहराडून, उत्तराखंड
16. सिद्धार्थ पब्लिक स्कूल, दिल्ली – 41
17. भारत माता सरस्वती बाल मंदिर, दिल्ली – 40
18. नॅशनल पब्लिक स्कूल, दिल्ली – 40
19. चांद राम सार्वजनिक वरिष्ठ माध्यमिक. शाळा, दिल्ली – 39
20. मॅरीगोल्ड पब्लिक स्कूल, दिल्ली – 39