कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट 2021-22च्या विजेत्यांची घोषणा! लाखो स्पर्धकांमधून कुणी मारली बाजी?

दिल्ली एनसीआर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य फायनलमध्ये चौथ्या पर्वाच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष व डिजिटल मीडियाचा वापर करून आयोजित केलेल्या कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिकच्या यंदाच्या पर्वामध्ये रेकॉर्ड-ब्रेकिंग १४०,००० हून अधिक मेकॅनिक्सनी सहभाग घेतला होता.

कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट 2021-22च्या विजेत्यांची घोषणा! लाखो स्पर्धकांमधून कुणी मारली बाजी?
पाहा कुणी कुणी मारली स्पर्धेत बाजी?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 6:00 PM

नवी दिल्ली : कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड (Castrol India Limited) या भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक ल्युब्रिकण्ट उत्पादक कंपनीने स्पर्धात्मक राष्ट्रीय व्यासपीठाच्या माध्यमातून भारतीय मेकॅनिक्सना (Indian Mechanics) अपस्किलिंग करण्याचा मनसुबा आहे. त्यातूनच भारतातील सर्वात मोठा मेकॅनिक स्किलिंग उपक्रम त्यांच्या सुपर मेकॅनिक कॉन्टेस्टच्या चौथ्या पर्वाच्या विजेत्यांची घोषणा केली. दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेन्द्र प्रधान, कॅस्ट्रॉल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप संगवान आणि टीव्ही 9 नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्टचे चौथे पर्व भारतभरातील मेकॅनिक्सकडून अधिकाधिक सहभागाच्या खात्रीसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन मीडियाचा वापर करत आयोजित करण्यात आला होका. या स्पर्धेमध्ये कॉन्टेस्टचे इंटरअॅक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स (आयव्हीआर) आणि समर्पित वेबसाइटच्या माध्यमातून एक लाख चाळीस हजारहून अधिक मेकॅनिक्सच्या विक्रमी सहभाग नोंदवला गेला होता.

सहभागी मेकॅनिक्सना विविध असाइनमेण्ट्स व आव्हानांमध्ये निपुण बनवण्यासाठी या कॉन्टेस्टमध्ये नवीन डिजिटल साधने आणि वैशिष्ट्यांसह मोबाइल गेमचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धकाच्या त्यांच्या क्षेत्रामधील कौशल्याची चाचणी करण्यासोबत त्यांना विविध टप्प्यांच्या माध्यमातून बहुमूल्य व संबंधित उद्योगक्षेत्र माहिती देखील मिळाली. ५ ते ७ एप्रिल २०२२ या तीन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑन-ग्राऊण्ड फिनालेमध्ये अव्वल ५० सहभागींनी एकमेकांशी स्पर्धा केली.

मेकॅनिक समुदायाचे अपस्किलिंग व उन्नतीप्रती आपली कटिबद्धता वाढवत कॅस्ट्रॉल इंडियाने ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी) सोबत सहयोगाने विशेषरित्या डिझाइन केलेला अभ्यासक्रम तयार केला, ज्यामध्ये आधुनिक वेईकल डायग्नोस्टिक्स, नेक्स्ट-जनरेशन वेईकलसाठी डिजिटल साधने आणि बीएस-६ तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश होता. मास्टरक्लासेसमध्ये देशभरातील २४,००० हून अधिक मेकॅनिक्स उपस्थित होते.

या कॉन्टेस्टबाबत बोलताना कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संदीप संगवान म्हणाले,

”कॅस्ट्रॉलच्या सुपर मेकॅनिक कॉन्टेस्टसह आमचा स्वावलंबी मेकॅनिक्सना त्यांच्या व्यवसायामध्ये पात्र असलेला आदर व अभिमान निर्माण करण्याचा मनसुबा आहे. आम्ही त्यांना बदलत्या उद्योग मानकांनुसार त्यांचे ज्ञान व कौशल्ये सतत अद्ययावत करण्यास प्रेरित करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे. या कॉन्टेस्टच्या चौथ्या पर्वाचे समापन होत असताना आम्हाला कॉन्टेस्टला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद, तसेच या कॉन्टेस्टने मेकॅनिक्सना दिलेला उत्साह व प्रेरणा पाहून खूप आनंद होत आहे. कॅस्ट्रॉल यंदाच्या हंगामामधील विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करते आणि मेकॅनिक समुदायाला सक्षम करण्याचे काम सुरूच ठेवेल.”

दरम्यान, माननीय केंद्रीय मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी म्हटलंय, की

”मेकॅनिक समुदाय भारताच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे महत्त्वपूर्ण घटक आहे. पद्धतशीर व संघटित पद्धतीने त्यांची प्रतिभा जोपासण्यासोबत त्यांची कौशल्ये अधिक निपुण करणे त्यांच्या उदरनिर्वाह संधी वाढवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यांना आत्मविश्वास व स्पर्धात्मकतेसह बदलत्या काळाशी सामावून जाण्यास मदत करू शकते. कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट सारखे उपक्रम मेकॅनिक्सना प्रेरित, अपस्किलिंग व प्रशिक्षित करण्यासोबत लक्षणीयरित्या देशामध्ये रोजगार व उद्योजकतेसाठी संधी वाढवण्यामध्ये लाभदायी ठरतात.”

टीव्ही 9 नेटवर्कसोबत यंदाच्या सीझनमधील सहयोगाचा भाग म्हणून कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक टीव्ही९ नेटवर्कवर प्रसारित करण्यात येईल आणि लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता रवी दुबे सुत्रसंचालन करतील. याप्रसंगी बोलताना टीव्ही९ नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास यांनी म्हटलंय की,

”कॅस्ट्रॉल इंडिया सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट उल्लेखनीय उपक्रम आहे. जागतिक अग्रणी असण्याची आपली प्रतिष्ठा कायम ठेवत कॅस्ट्रॉलने नवीन बेंचमार्क्स स्थापित केले आहेत. आम्हाला समुदायांना सक्षम करण्याच्या या संकल्पनेशी संलग्न होण्याचा अभिमान वाटतो. आमच्यासाठी 1.4 लाख सहभागींपैकी प्रत्येक विजेता आहे. टीव्ही 9 नेटवर्क कॅस्टॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्टच्या यंदाच्या सीझनच्या विजेत्यांचे अभिनंदन करते.”

आपले कौशल्य, ज्ञान आणि ऑटोमोबाइल्सप्रती रूचीसह उदयोन्मुख विजेते काल्का प्रसाद व किशोर कल्लपा गताडे यांचा अनुक्रमे कार व बाइक विभागांमध्ये कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट 2021-22 चे चॅम्पियन्स म्हणून गौरव करण्यात आला. दोन्ही विजेत्यांना एक बाइक, चार सदस्य असलेल्या कुटुंबासाठी दोन वर्षांचे विमा संरक्षण आणि १००,००० रूपयांचा धनादेश किंवा गॅरेज मेकओव्हरसह पुरस्कारित करण्यात आले. दोन्ही विभागांमधील उपविजेते मारू मयुर भाई आणि प्रवेश कुमार रावत यांना बाइक आणि चार सदस्य असलेल्या कुटुंबासाठी एक वर्षाचे विमा संरक्षण यासह पुरस्कारित करण्यात आले.

कार विभागामध्ये कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट 2021-22 चे विजेते मेकॅनिक काल्का प्रसाद म्हणाले,

”मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्याकडे हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. कॅस्ट्रॉल इंडियाने आमच्या मेकॅनिक समुदायासाठी केलेली आणि करत असलेली कामगिरी अत्यंत प्रशंसनीय आहे. या कॉन्टेस्टने आम्हाला देशभरात ओळखले जाण्यामध्ये मदत केली आहे आणि आमच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आदर मिळवून दिला आहे. प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून मला मिळालेला अनुभव, माहिती व कौशल्ये बहुमूल्य आहेत. कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक भारतभरातील मेकॅनिक्सचा दीर्घकालीन स्थिर विकास करण्यामध्ये मदत करण्यासोबत सामाजिक उन्नती संपादित करण्यामध्ये मदत करेल. मी माझे भविष्य घडवण्यासाठी मिळालेल्या सर्व ज्ञानाचा उपयोग करण्यास उत्सुक आहे आणि सहकारी मेकॅनिक्सना माझे ज्ञान व कौशल्य शेअर करण्याची आशा करतो.”

कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक 2021-22 च्या विजेत्यांची यादी:

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.