बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचं मत
बारावीच्या परीक्षा घेतल्या जाव्यात ही बिहार सरकारची भूमिका आहे. CBSE board exam Vijay Kumar Chaudhary
CBSE 12th Board Exam 2021 नवी दिल्ली: बारावीच्या परीक्षा घेतल्या जाव्यात ही बिहार सरकारची भूमिका आहे. बिहारचे शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांचं आयोजन केलं जावं, असं म्हटलं. बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणात आणि आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. सध्याच्या परिस्थितीत बारावीच्या परीक्षां घेण्यासारखी परिस्थिती नसली तरी संभाव्य तारीख जाहीर केली जावी. बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय आहे, असं देखील विजय कुमार चौधरी म्हणाले. (CBSE 12th board exam 2021 Bihar Education Minister Vijay Kumar Chaudhary said board exam should be conducted online exam is one option)
एएनआय वृत्तसंस्थेच ट्विट
CBSE board examinations should be conducted as it plays a vital role in students’ life. However, this can’t happen amid the current situation. But a tentative date should be announced. There is also an option of online examination: Bihar Education Minister Vijay Kumar Chaudhary pic.twitter.com/k72eOhpfCv
— ANI (@ANI) May 25, 2021
ऑनलाईन परीक्षेचा पर्याय
बिहारचे शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा हा देखील एक पर्याय असल्याचं म्हटलं आहे. बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सध्या परीक्षा आयोजित करण्यासारखी परिस्थिती नसली तरी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर कराव्यात, असं देखील ते म्हणाले.
नवी दिल्लीच्या आणि केरळच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करा
नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री यांनी उच्च स्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षा घेण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण करुन घ्यावं, अशी मागणी केली. लसीकरणासाठी केंद्रानं फायजर कंपनीसोबत बोलावं. असा प्रस्ताव देखील मनीष सिसोदिया यांनी मांडला. केरळ सरकारनं देखील विद्यार्थ्यांचं लसीकरण करावं अशी भूमिका मांडली.
महाराष्ट्राची भूमिका काय?
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका मांडल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
कर्नाटक, तामिळनाडू राज्य परीक्षा घेण्याच्या बाजूनं
कर्नाटक आणि तामिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांनी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरमधील महत्वाची गोष्ट असल्याचं सांगतिलं. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार बारावीची परीक्षा आयोजित करण्याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करु असं सांगितलं. तर दुसरीकडे, तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे.
संबंधित बातम्या:
(CBSE 12th board exam 2021 Bihar Education Minister Vijay Kumar Chaudhary said board exam should be conducted online exam is one option)