CBSE Board Exam 2021 : कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईची मोठी घोषणा, बाधित विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलणार
सीबीएसईने असे म्हटले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला घरीच सेल्फ-आयसोलेशन करण्याचा सल्ला दिला जाईल. (CBSE announces for corona positive students, postpones practical exams for affected students)
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोर्ड परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी प्रॅक्टिकल परीक्षा दिली जाऊ शकते. आता त्यांना प्रॅक्टिकल परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, ज्या उमेदवारांच्या चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह (CBSE Practical Exam Date) आहेत, त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलली जाईल आणि लेखी परीक्षा संपल्यानंतर घेण्यात येईल. तसेच, सीबीएसईने असे म्हटले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला घरीच सेल्फ-आयसोलेशन करण्याचा सल्ला दिला जाईल. (CBSE announces for corona positive students, postpones practical exams for affected students)
विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा
एका अहवालानुसार सीबीएसई बोर्ड (CBSE Board) तर्फे या घोषणेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जवळ आल्या आणि दुसरीकडे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत होती. त्याचबरोबर कोलकातामधील बर्याच शाळांमध्ये कोरोनाच्या काळातही 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा लवकरच प्रॅक्टिकल सुरू करणार आहेत.
परीक्षा केंद्रे बदलण्याचा पर्याय
सीबीएसईच्या या घोषणेमुळे बर्याच शाळांना मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांवरील दबावही कमी होईल. नुकतीच सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय जारी केला होता. सीबीएसईने नोटीस बजावून परीक्षा केंद्र बदलण्याची घोषणा केली. यात सीबीएसईने म्हटले होते की, कोरोना कालावधीत बरेच विद्यार्थी पालकांसह इतर शहरांमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्याला दहावी व बारावीच्या परीक्षेला हजेरी लावायची असेल त्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पुरेशी शिथिलता मिळेल.
परीक्षा केंद्र कसे बदलावे?
उमेदवार कोरोना संक्रमित असल्यास किंवा कोरोनामुळे त्यांच्या शहरात नसल्यास प्रायोगिक आणि सैद्धांतिक परीक्षेचे केंद्र बदलू शकतात. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. याशिवाय आपण आपल्याच शहरातील केंद्र बदलू इच्छित असाल तर अर्ज करू शकतात, परंतु अंतिम निर्णय सीबीएसई बोर्डाद्वारे घेतला जाईल. उमेदवारांना दोन्ही सैद्धांतिक आणि व्यावहारिक परीक्षांची केंद्रे बदलण्याची इच्छा असल्यास परीक्षा केंद्र वेगवेगळ्या शाळांमध्ये दिले जाईल. परीक्षा केंद्र बदलणार्या उमेदवारांचे गुण अपलोड करताना शाळेला ट्रान्सफर (T) लिहावे लागेल. सीबीएसईने सर्व संबंधित शाळांना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेची प्रॅक्टिकल परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन 1 मार्च ते 11 जून दरम्यान करण्यास सांगितले आहे. (CBSE announces for corona positive students, postpones practical exams for affected students)
Video | Sangli शहरात Leopard शिरला, वनविभागाकडून बिबट्या पकडण्याचे प्रयत्न #LeopardAttack #MahaForestDepartment #Sangli pic.twitter.com/E37q3zbSfq
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
इतर बातम्या
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून ‘या’ वर्षाची आकडेवारी जाहीर
जुळलेल्या लग्नात नवरदेवाकडूनच विरजण, आधी नवरीवर बंधनं घातली, नंतर सासरच्या मंडळींवर गोळीबार