CBSE 12th Result 2022 Updates : बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी, ‘इथे’ पाहू शकता निकाल

CBSE Board 12th Result 2022 date and time News in marathi : अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल (CBSE 12th results 2022) जाहिर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली.

CBSE 12th Result 2022 Updates : बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी, 'इथे' पाहू शकता निकाल
joSAA counselling important dates
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:14 AM

CBSE Result 2022 : अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल (CBSE 12th results 2022) जाहिर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली. बारावी सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या परीक्षेमध्ये (Exam) एकूण 94.54 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 91.25 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के इतका लागला. तर 97.04 टक्के एवढा केंद्रीय विद्यालयाचा निकाल लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये त्रिवेंद्रम अव्वल स्थानावर असून, इतर झोनच्या तुलनेत त्रिवेंद्रम झोनची टक्केवारी ही सर्वाधिक आहे. विद्यार्थी digilocker.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल चेक करू शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएससीच्या निकालाची चर्चा होती. मात्र निकाल काही लागला नव्हता. अखेर आज सीबीएससी बोर्डाने निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.

आज दोन वाजता दहावीचा निकाल

दरम्यान आज दुपारी दोन वाजता सीबीएसई बोर्डाच्या दाहावीचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.आज दुपारी दोन वाजता दाहावीचा निकाल घोषीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. सीबीएसई बोर्डाची टर्म एकची परीक्षा ही एमसीक्यू फॉरमॅटमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. तर टर्म 2 परिक्षा ही डिस्क्रिप्टि स्वरुपात घेण्यात आली होती.

असा चेक करा आपला निकाल

  1. सर्वात प्रमथ ऑफिशियल वेबसाईट digilocker.gov.in ओपन करा
  2. त्यानंतर त्या साईटवर आवश्यक ती सर्व माहिती तुमचा आधार नंबर आणि परीक्षा क्रमांक सबमिट करा
  3. हे सुद्धा वाचा
  4. त्यानंतर तिथे असलेल्या CBSE 12th results 2022 या पर्यावर क्लिक करा
  5. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल हा संगणकाच्या, मोबईलच्या स्किनवर पहाता येईल
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.