CBSE 12th Result 2021 मुंबई : सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021) आज जाहीर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धाकधूक आहे. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर होईल. सीबीएसई 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांना रोल नंबर चेक करण्यासाठीची लिंक ऑफिशिअल वेबसाईट cbse.gov.in वर अॅक्टिव्ह झाली आहे. या वेबसाईटवर जाऊन ‘Roll Number Finder’वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल.
सीबीएसईने 12 वी परीक्षेचा निकाल बोर्डाची वेबसाईट cbseresults.nic.in वर जाहीर होत असल्याने, या वेबसाईटवर अतिरिक्त भार येण्याची शक्यता आहे. दुपारी दोन वाजता सर्व विद्यार्थी या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश होऊ शकते. मात्र अशा परिस्थितीत मनस्ताप करुन न घेता, निकाल पाहण्यासाठी दुसरे पर्यायही तपासावे. विद्यार्थ्यांसाठी CBSE 12 वीचा निकाल SMS द्वारेही पाहता येऊ शकतो.
CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अन्य पर्याय आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.
डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.
विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन <CBSE12>space<Roll Number>space<Admit Card ID> हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल.
याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.
संबंधित बातम्या
CBSE Class 12 Result 2021 Live Updates : सीबीएसई बोर्ड 12 वी निकाल लाईव्ह अपडेट