CBSE board exam: बोर्ड परीक्षांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, परीक्षा घ्यावी असं म्हणणाऱ्यांची भूमिका काय?
कोरोनामुळं बोर्ड परीक्षा रद्द व्हाव्यात म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आलीय मात्र, काही जण परीक्षा घेण्याच्या बाजून देखील आहेत.c
नवी दिल्ली : सीबीएसई म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टात सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची याचिका अॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर सोमवारी सुनावणी होणार आहे. हे सर्व असताना बारावीच्या परीक्षांवरुन विद्यार्थी आणि पालक यांच्यात दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. बारावीची परीक्षा विद्यार्थऱ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं महत्वाची असल्यानं ती घेण्यात यावी, असं मत काही शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी मांडलं आहे. (CBSE board exam 2021 Education sector peoples why supporting decision of conduction board exam)
बारावीच्या परीक्षा का घ्याव्यात?
बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. या परीक्षांवर त्याच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरवली जाते. पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देखील, किंवा विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो तेव्हा बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचं स्वरुप बदलून घ्याव्यात, असंही काही जणांकडून मांडण्यात येतं आहे.
मुख्य विषयांच्या परीक्षेचा पर्याय
सीबीएसईच्या परीक्षा आयोजित करताना मुख्य विषयांच्या पेपर्सचं आयोजन करण्यात यावं. सीबीएसईच्या ग्रुपनुसार मुख्य विषयांमध्ये 20 विषयांचा समावेश होतो. या परिक्षां बहुपर्यायी स्वरुपात घेतल्या जाव्यात म्हणजे कमी वेळात परीक्षा पार पडेल, असंही काही तज्ज्ञांचं मतं आहे.
ओमएआर पद्धत वापरा
बारावीच्या परीक्षा आयोजित करताना त्या बहूपर्यायी स्वरुपात आयोजित केल्या जाव्यात. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका ओएमआर स्वरुपात दिल्या जाव्यात. हा पर्याय वापरल्यास परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि निकाल जाहीर करण्यामध्ये कमी वेळ लागेल, असं देखील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
सीबीएसईचे देशभरात 14 लाख विद्यार्थी
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांसाठी देशभरातून 14 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. भारतातील सर्व परीक्षा बोर्डांची विद्यार्थ्यांची संख्या दीड कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य परीक्षा मंडळाचे बारावीची विद्यार्थी संख्या 14 लाख असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे 30 मे आणि 1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात.
संबंधित बातम्या:
राज्य सरकारकडून दहावीच्या निकालाचे निकष जाहीर, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना काय वाटतं?
CBSE board exam: सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षांवरील सुनावणी स्थगित, याचिकेवर पुन्हा सुनावणी कधी?
(CBSE board exam 2021 Education sector peoples why supporting decision of conduction board exam)