सीबीएसईच्या परीक्षांचं काय होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी होणार

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. CBSE board exam

सीबीएसईच्या परीक्षांचं काय होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी होणार
Supreme Court
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 10:38 AM

नवी दिल्ली : सीबीएसई म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची याचिका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या बेंच समोर आज सुनावणी होणार आहे. सीबीएसईच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात याचिकेवर काय निर्णय येणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. (CBSE board exam 2021 Supreme Court of India hear today petition demanding cancelling board exam)

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बारावीच्या परीक्षेसंदर्भात 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. त्यानंतर रमेश पोखरियाल यांनी 25 मे पर्यंत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांकडून अहवाल मागवले होते. सुप्रीम कोर्टातील आज होणाऱ्या सुनावणीत काय होते हे पाहावं लागणार आहे.

300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे 30 मे आणि 1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.

सीबीएसईचे देशभरात 14 लाख विद्यार्थी

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांसाठी देशभरातून 14 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. भारतातील सर्व परीक्षा बोर्डांची विद्यार्थ्यांची संख्या दीड कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य परीक्षा मंडळाचे बारावीची विद्यार्थी संख्या 14 लाख असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

संबंधित बातम्या:

गुजरातचं ठरलं, बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून, महाराष्ट्राचा निर्णय कधी होणार?

बोर्डाच्या परीक्षा घेता येत नसतील तर राजीनामा द्या, प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारवर निशाणा

CBSE board exam 2021 Supreme Court of India hear today petition demanding cancelling board exam

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.