CBSE चा दहावीच्या निकालाविषयी मोठा निर्णय, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सादर करण्याबाबत महत्वाचे आदेश जारी

अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांचं रेकॉर्ड 30 जूनपर्यंत जमा करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. CBSE class 10 marks

CBSE चा दहावीच्या निकालाविषयी मोठा निर्णय, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सादर करण्याबाबत महत्वाचे आदेश जारी
सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 6:20 PM

नवी दिल्ली: कोरोना माहामारीमुळे राज्यासह देशातील काही परीक्षा लांबणीवर पडल्या. तर कही परीक्षा थेट रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता CBSE Board नेसुद्धा मोठा निर्णय घेतला होता. सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सीबीएसईनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी एक कार्यप्रणाली तयार केली होती. त्या कार्यप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांचं रेकॉर्ड 30 जूनपर्यंत जमा करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. (CBSE has extended the deadline up to June 30th for schools to tabulate class 10 marks and submit them to the board)

सीबीएसईकडून मुदतवाढ का?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं कार्यप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांचं रेकॉर्ड 30 जूनपर्यंत जमा करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. सीबीएसएईनं ही मुदत कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहता वाढवली आहे. देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि विविध राज्यांनी लावलेले लॉकडाऊन पाहता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचं रेकॉर्ड सीबीएसईकडे जमा करण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी सीबीएसईकडं अतंर्गत मूल्यमापनाचे गुण जमना करण्याची मुदत 11 जून होती.

सीबीएसई दहावीचा निकाल कसा लावणार?

सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांना गूण देण्यासाठी पद्धत काय असावी याबाबत आपल्या वेबसाईटवर सविस्तरपणे सांगितलं आहे. ही सर्व माहिती cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

1) प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येईल. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि एकूण 7 शिक्षक असतील. 7 शिक्षकांमध्ये 5 शिक्षक हे शाळेतील तर 2 शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील नेमण्यात येतील.

2) प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी 100 पैकी मार्क्स दिले जातील. यामध्ये 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतील. तर बाकीचे 80 रिझल्ट समिती देईल. बहुतांश शाळांमध्ये इटरनल असेसमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या शाळांनी इंटरनल असेसमेंटचे मार्क सीबीएसई पोर्टलवर अपलोड केलेले नाहीत. त्यांना ते 11 जून 2021 पर्यंत अपलोड करणे बंधनकारक होते. आता ती मुदत वाढवण्यात आली आहे

3) चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थाने विविध परीक्षांमध्ये मिळवलेले गुण यांच्या आधारवर बाकीच्या 80 गुणांपैकी गुण दिले जातील.

4) या सर्व प्रक्रियेत पारदर्शकपता, सत्यता असणे गरजेचे आहे. त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडून शाळेने दिलेल्या गुणांचे मूल्यांकन केले जाऊ शकते.

संबंधित बातम्या:

CBSE SSC Exam Assessment Procedure | इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचे ‘असे’ होणार मूल्यांकन, सीबीएसई बोर्डाकडून गाईडलाईन्स जारी

शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू

(CBSE has extended the deadline up to June 30th for schools to tabulate class 10 marks and submit them to the board)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.