CBSE, ICSE Class 12 Exams: बारावीच्या परीक्षा रद्द होणार का? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या आणि आयसीएसई बोर्डाच्या (ICSE) परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर ही सुनावणी होईल. (CBSE board exam 2021 Supreme Court of India hear petition demanding cancelling board exam)
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
ममता शर्मा यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी 28 मे म्हणजेच शुक्रवारी स्थगित करण्यात आली होती. आज होणाऱ्या सुनावणीत काय होणार हे पाहावं लागणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 1 जूनला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर केलं होतं. न्यायालय या बाबीकडे लक्ष देणार का पाहावं लागेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बारावीच्या परीक्षेसंदर्भात 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. त्यानंतर रमेश पोखरियाल यांनी 25 मे पर्यंत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांकडून अहवाल मागवले होते. सुप्रीम कोर्टातील आज होणाऱ्या सुनावणीत काय होते हे पाहावं लागणार आहे
300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.
केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.
बारावी परीक्षेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी https://t.co/QwAcVSDADQ #HSC #SC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या:
CBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न
CBSE board exam: सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षांवरील सुनावणी स्थगित, याचिकेवर पुन्हा सुनावणी कधी?
(CBSE ICSE board exam 2021 Supreme Court of India hear petition demanding cancelling board exam)