CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना ‘हँडक्राफ्ट’ शिकण्याची संधी

| Updated on: Jun 28, 2021 | 1:14 PM

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने हँडक्रॉप्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल काऊन्सिल(HCSSC)च्या मदतीनं हँडबुक लॉंच केलय. हे हँडबुक स्किल मॉड्युल प्रॅक्टिकल अॅक्टिविटीजवर आधारीत आहे.

CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना हँडक्राफ्ट शिकण्याची संधी
सीबीएसई बोर्ड
Follow us on

मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने हँडक्रॉप्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल काऊन्सिल(HCSSC)च्या मदतीनं हँडबुक लॉंच केलय. हे हँडबुक स्किल मॉड्युल प्रॅक्टिकल अॅक्टिविटीजवर आधारीत आहे. यातून विद्यार्थ्यांना शिकण्याचा अनुभव मिळेल. या हँडबूकमध्ये दोन मॉड्युल आहेत- एक पेपर मॅश आणि फॅशन ज्वेलरी. (CBSE launches Handbook Class 6th and 8th Opportunity for students to learn Handicraft)

एचसीएसएससीचे सीईओ कृष्णकुमार यांचं म्हणणं आहे की, हँडबुकमध्ये दिलेल्या व्यावहारीक टास्कमध्ये रिसायकल मटेरियलचा वापर केला गेलाय. ज्यामुळे कमी वयात मुलांना पर्यावरणविषयक सवयी रुजवायला मदत होईल. हे दोन्ही मॉड्युल शिकण्यासाठी आवश्यक उपकरणं, सामग्री विद्यार्थ्यांना शाळांमधून सहज उपलब्ध होईल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ते सुरक्षित आहे.

टिचर्ससाठी ट्रेनिंग प्रोग्राम

CBSE चे डायरेक्टर(कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण) डॉ. विश्वजित साहा यांच्यानुसार, आतापर्यंत सातशे पेक्षा जास्त शाळांनी आधीच हे मॉड्युलचा पर्याय निवडलेला आहे. विद्यार्थ्यांना हे मॉड्युल शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजीत केले जातील.

वेबसाईटवरून डाऊनलोड करा

CBSE स्टुडंट हँडबुक किंवा वर्कबूक (CBSE Launched Handbook) सीबीएसईची अकॅडमिक वेबसाईट cbseacademic.nic.in वर जारी करण्यात आलं आहे. इतर गरजेची सगळी उपकरणं शाळेतून मिळतील आणि ते सर्व सुरक्षित असल्याचं बोर्डानं म्हटलंय.

सीबीएसई अध्यक्षांची माहिती

सीबीएसई अध्यक्ष मनोज आहुजांनी सांगितलं की, मी विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक विकसित केल्याबद्दल एचसीएसएससीच्या प्रयत्नांचं कौतूक करतो आणि अपेक्षा करतो की, हे मॉड्युल भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मदत करेन. अशीच कल्पना शैक्षणिक धोरणात (NEP-2020) केली गेली आहे.

संबंधित बातम्या : 

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही? राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली?

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

(CBSE launches Handbook Class 6th and 8th Opportunity for students to learn Handicraft)