CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर

केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये (CBSE Board Exam) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक परीक्षा सुरु झाली आहे.

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 11:25 AM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये (CBSE Board Exam) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक परीक्षा सुरु झाली आहे. सीबीएसई बोर्डानं प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, असाइनमेंट आणि अंतर्गत मूल्यमापनाचं रेकॉर्ड 11 जूनपर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसीईनं कोरोनासंबंधी नियमांचे पालन करुन प्रात्याक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीबीएसईनं नियुक्ती केलेल्या शिक्षकांशिवाय अन्य शिक्षकानं परीक्षा घेतल्यास गुण दिले जाणार नाहीत, असा प्रकार घडल्यास लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे प्रात्याक्षिक गुण देण्यात येणार आहेत. (CBSE practical exams for 10 and 12 class begin check details )

प्रात्याक्षिक परीक्षेपूर्वी आणि नंतर सॅनिटायझेशन

सीबीएसईने दिलेल्या निर्देशानुसार प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यापूर्वी आणि नंतर प्रयोगशाळा सॅनिटाईझ केले जाईल.प्रात्याक्षिक परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर पुरवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क शिवाय प्रयोगशाळेत प्रवेश दिला जाणार नाही.

25 विद्यार्थ्यांची बॅच

सीबीएसईनं दिलेल्या माहितीनुसार प्रात्याक्षिक परीक्षेसाठी 25-25 विद्यार्थ्यांची बॅच बनवली जाईल. विद्यार्थ्यांचे दोन गट केले जातील. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी असं करण्यात येत आहे. प्रात्याक्षिक परीक्षेच्या दरम्यान कोरोनसंबंधी नियमांचं पालन केले जाणार आहे. यासाठी सीबीएसईनं मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्रदेखील लिहिलं आहे.

सीबीएसईचं परीक्षेचे वेळापत्रक कसं पाहाल?

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या. 2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा. 3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल. 4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Special Story : अर्थसंकल्पात शिक्षणावर किती खर्च? महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञांचं मत काय?

(CBSE practical exams for 10 and 12 class begin check details )

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.