CBSE class 12th Result : सीबीएसईचा बारावीच्या निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांना दिलासा, ऑफलाईन परीक्षेची घोषणा

| Updated on: Aug 02, 2021 | 9:27 PM

अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर दिलेल्या गुणांमुळे संतुष्ट नसलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या कम्पार्टमेंट परीक्षांमध्ये बसण्याची संधी दिली जाईल.

CBSE class 12th Result : सीबीएसईचा बारावीच्या निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांना दिलासा, ऑफलाईन परीक्षेची घोषणा
सीबीएसई
Follow us on

CBSE class 12th Result नवी दिल्ली : सीबीएसईनं शुक्रवारी बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर दिलेल्या गुणांमुळे संतुष्ट नसलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या कम्पार्टमेंट परीक्षांमध्ये बसण्याची संधी दिली जाईल, असं सीबीएसईनं एक नोटिफिकेशन काढून जाहीर केलं आहे. कम्पार्टमेंट परीक्षांमध्ये मिळालेले गुण अंतिम समजले जाणार आहेत.

16 ऑगस्टपासून परीक्षा

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने ज्या उमेदवारांना ऑफलाइन परीक्षांना बसण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. जे विद्यार्थी मूल्यांकनाच्या सूत्रानुसार जारी करण्यात आलेल्या निकालाबद्दल संतुष्ट नसतील ते परीक्षांना बसू शकतात. कंपार्टमेंट परीक्षा विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा घेतली जाणार आहे.ही परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण अंतिम मानले जातील.

नोंदणी पोर्टल लवकरच सुरू होईल

बारावी निकालासंदर्भात असंतुष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा नोंदणीसाठी पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 2021 मध्ये जाहीर झालेल्या निकालामधील कंपार्टमेंट श्रेणीतील विद्यार्थ्यांना देखील पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. खासगी विद्यार्थी आणि इतर कारणांमुळे पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे ज्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला नाही त्यांना देखील अर्ज सादर करावे लागणार आहेत.

शुल्क भरावे लागणार नाही

श्रेणी सुधार, खासगी तसेच दुसऱ्या कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. कंपार्टमेंट उमेदवारांना अधिसूचनेनुसार शुल्क भरावे लागेल. परीक्षा केवळ कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आयोजित केली जाईल.

परीक्षा केंद्र

सीबीएसई भारतासह परदेशातील नियुक्त केंद्रांवर कंपार्टमेंट परीक्षा घेईल. कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन केंद्रांच्या संख्येबाबत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रत्येक केंद्रात, सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचं काटेकोरपणे पालन करत परीक्षा केंद्रांवर कमी विद्यार्थी संख्या असेल.

सीबीएसईचा बारावीचा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा निकाल 99.13 टक्के आहे.

इतर बातम्या:

 HSC Result date 2021 : महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच!

CBSE 12th Result 2021 : सीबीएसई निकाल तुमच्या मोबाईलवर कसा मिळेल?

CBSE Special Exam 2021 for students who not satisfied with marks will get opportunity to appear in exam conduct from 16 Aug