CBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न
सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अॅप नंतर विद्यार्थ्यांसाठ टेली काऊन्सलिंग हेल्पलाईन सुरु केली आहे. CBSE Tele counselling
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अॅप नंतर विद्यार्थ्यांसाठ टेले काऊन्सलिंग हेल्पलाईन सुरु केली आहे. सीबीएसईनं सलग 24 व्यावर्षी हेल्पलाईन सुरु केली आहे. ही हेल्पलाईन विद्यार्थी आणि पालकांसाठी सुरु करण्यात आली आहे. 1800 11 8004 या क्रमांकावरुन विद्यार्थी आणि पालकांचं समुपदेशन केलं जाणार आहे. ही सुविधा 24 मे पासून सुरु झाली आहे. (CBSE started Tele Counselling launched for class 10th 12th students and their Parents after launching app)
समुपदेशन कोणत्या वेळी केलं जाणार?
टेली काऊन्सलिंगबाबत माहिती देताना सीबीएसईनं दोस्त फार लाईफ अॅपवर देशातील 83 तज्ञ मार्गदर्शन करत आहेत. मात्र, हेल्पलाईनवर सीबीएसईशी संलग्नित असलेल्या 24 शाळांचे मुख्याध्यापक, समुपदेशक मार्गदर्शन करतील. हे तज्ज्ञ सोमवारी ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
समुपदेशन दरवर्षी करण्यात येते
बोर्ड परीक्षांपूर्वी विद्यार्थी आणि पालकांवरील मानसिक तणाव कमी करण्यासाठी दरवर्षी समुपदेशन केलं जातं. कोरोना विषाणूच्या काळात विद्यार्थी आणि पालकांसाठी सीबीएसईनं विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ राखण्यासाठी सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अॅप नुकतेच लाँच केले आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सीबीएसईकडून समुपदेशन कार्यक्रम राबवला जातं आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीचा निर्णय लवकरच
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 14 एप्रिल रोजी घेण्यात आला होता. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गूण देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल त्यांची परीक्षा कोरोना संक्रमण संपल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल, असं सीबीएसईनं जाहीर केलं होते. दरम्यान, बारावी परीक्षांचं आयोजन कशा प्रकारे याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या निर्णयानुसार 1 जून रोजी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परीक्षांचं आयोजन करण्याबाबत निर्णय जाही होणार आहे.
संबंधित बातम्या:
CBSE started Tele Counselling launched for class 10th 12th students and their Parents after launching app