ePathshala: पहिली ते बारावीपर्यंतची NCERT ची सर्व पुस्तके ई-बुक स्वरुपात, शिक्षण मंत्रालयाकडून ई-पाठशाला ॲप लाँच
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या परिस्थितीत ई-पाठशाला नावाचं पोर्टल आणि अॅप लाँच केलेलं आहे. Central Education Ministry ePathshala
ePathshala नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यानंतर देशामध्ये शिक्षण क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च 2020 पासून देशातील शाळा महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत. विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचू शकलेले नाहीत. भारतात सध्या कोरोनाविषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेमध्ये देशातील विविध राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत पुस्तकांची दुकानं बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलो आहोत, अशावेळी पुस्तकांची दुकाने देखील बंद आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या परिस्थितीत ई-पाठशाला नावाचं पोर्टल आणि अॅप लाँच केलेलं आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची पुस्तकं ही ई-पाठशाला पोर्टल आणि अॅपवर उपलब्ध असतील. (Central Education Ministry started ePathshala app for class first to twelve students )
पालकांची अडचण दूर होणार
ई-पाठशाला पोर्टल आणि अॅपमूळं विद्यार्थ्यांना ई बुक स्वरूपात पुस्तके उपलब्ध होतील. यामुळे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. एनसीईआरटीची पुस्तके उपलब्ध होत नसल्याने पालकांमध्ये ही अस्वस्थता होती. ही अस्वस्थता दूर होण्यासाठी आता मदत होणार आहे. शालेय शिक्षण व्यवस्थित स्वरूपात सुरू राहण्यासाठी ई-पाठशाला पोर्टल आणि ॲप लाँच केल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं.
ॲपवर बऱ्याच गोष्टी
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या वर्षभरामध्ये ई लर्निंग विविध साधन विकसित करणे या गोष्टींवर भर दिला गेला. गेल्या वर्षभरात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वर्ग सहभाग घेतला. आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ई-पाठशाला हे मोबाईल ॲप आणि पोर्टल विकसित केलेलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक, ऑडिओ, व्हिडीओज, मासिक याशिवाय इतर डिजीटल साधने देखील उपलब्ध होतील.
ई-पाठशाला ॲप डाऊनलोड कसे करायचे?
तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मधील गुगल प्ले स्टोअरवरुन हे ॲप डाऊनलोड करु शखता करा तिथे ही बारशाला हे टाईप करा यानंतर तुमच्यासमोर येईल या ॲप ची साईज सात एमबी आहे यामुळे तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून हे डाउनलोड करू शकता विद्यार्थ्यांना या मध्ये त्यांचे नाव आणि वर्ग भावा लागेल माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर पुस्तक ऑडिओ-व्हिडिओ मासिकं यासारख्या गोष्टी उपलब्ध होतील.
Book stores closed? Access e-textbooks by #NCERT for classes I to XII on ePathshala and ensure continued learning for your child.https://t.co/WRNuceN0FY#eLearning #DigitalIndia pic.twitter.com/xyfg331shr
— Ministry of Education (@EduMinOfIndia) May 22, 2021
संबंधित बातम्या
नोकरी सोडताना ‘हा’ फॉर्म भराच, अन्यथा तुमचे पैसे मिळवताना नाकीनऊ येईल
(Central Education Ministry started ePathshala app for class first to twelve students )