शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल, 12 विषयांचे 120 ग्राफिक कॉमिक्स बुकचे प्रकाशन
या कॉमिक्समध्ये वर्ग 3 ते 12 पर्यंतच्या 12 विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मदत करण्याचे काम केले जात आहे. (central government take new step for improvement in teaching status, launched graphic comics book)
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सोमवारी देशातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांसाठी 120 ग्राफिक कॉमिक्स (Graphics Comics) लाँच केले. शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचे शिक्षण अधिक चांगले करण्यासाठी सरकारचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतातील 13 राज्यांच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एकत्रितपणे ग्राफिक्स कॉमिक्स बुक तयार केले आहे. (central government take new step for improvement in teaching status, launched graphic comics book)
या कॉमिक्समध्ये वर्ग 3 ते 12 पर्यंतच्या 12 विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मदत करण्याचे काम केले जात आहे. ही पुस्तके स्टडी मटेरियल म्हणून वापरली जातील, ज्यात इतर विविध कौशल्ये शिकण्यावर तसेच महिला सबलीकरण आणि नैतिक शिक्षणाच्या बारीकसारीक गोष्टींवर भर देण्यात येईल.
जुलैमध्ये पहिली कॉमिक्स लाँच
मुलांमध्ये विचार करण्याची व समजण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक प्रश्नाचे तार्किक उत्तर देण्यासाठी स्पेशल कॉमिक्स बुक (Graphics Comics) तयार केले जात आहे. त्याचे नाव ‘कोगीतो’ आहे. यामध्ये केवळ दोन पात्रे अंकित आणि अंकिता एकमेकांशी संवाद साधतात, जे कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यातून आपण बुद्धीने कसा विचार करतो याचे उत्तर हे कॉनिक्स वाचून मुलांना माहिती होईल.
वेबसाईट करा डाऊनलोड
शनिवारी कॉम्पिटीन्सी बेस्ड लर्निंग अंतर्गत कॉमिक्सची सुरुवात करण्यात आली. कोणत्याही वर्गातील कोणताही विद्यार्थी ते डाउनलोड करुन सीबीएसई वेबसाईटवरून वाचू शकतो. हे दीक्षा पोर्टलच्या माध्यमातून वाचले जाऊ शकते. सीबीएसईचे सिटी कोऑर्डिनेटर सरदार बलविंदर सिंग म्हणतात की, मुलांमध्ये वाचन आणि समजून घेण्याची कला अतिशय रंजक मार्गाने विकसित करण्यासाठी हे सुरू केले आहे.
काय म्हणाले शिक्षणमंत्री?
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सोमवारी सीबीएसईच्या 13 राज्यांतील 50 शाळांच्या वतीने 120 ग्राफिक्स कॉमिक्स बुकचे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी देशातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कॉमिक्सबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे कॉमिक्स शिक्षण आणि विषयांना मनोरंजक, समजण्यायोग्य बनवतात. हे एक यशस्वी स्टडी मटेरियल असल्याचे सिद्ध होईल. हे कॉमिक्स दीक्षा प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातील जिथून ते सहजपणे डाऊनलोड करता येतील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना कॉमिक बुक
ज्यावेळी संपूर्ण देश कोरोना संकटाशी झुंज देत होता, त्यावेळी सीबीएसईने शिक्षणामुळे त्रस्त असलेल्या मुलांसाठी कोरोना कॉमिक्स लाँच केले. सीबीएसईने मुलांसाठी शाळांमध्ये कोरोना कॉमिक बुक पाठविले. यामध्ये प्रत्येक शालेय मुलाकडे कॉमिक बुक आणण्याच्या सूचना प्राचार्यांना देण्यात आल्या. यासाठी सीबीएसईने ‘किड्स वायु अँड कोरोना-हू विंस द फाईट’ नावाचे कॉमिक बुक सुरू केले. (central government take new step for improvement in teaching status, launched graphic comics book)
GIC Recruitment 2021 | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, जीआयसीमध्ये ऑफिसर पदावर भरती, 65 हजार रुपये पगारhttps://t.co/xkgCahYCLY#jobs | #Governmentjobs | #Sarkarinaukri | #GIC
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
इतर बातम्या
सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्याचे थकीत 3 हप्ते लवकरच मिळणार
रेल्वे आणि बस प्रवासातही रियाज करायचे; लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे हे किस्से माहीत आहेत काय?