JEE Main 2025 Exam Date : जेईई मेन 2025 सेशन 1 परीक्षेची तारीख जाहीर, संपूर्ण शेड्यूल घ्या जाणून

JEE Main 2025 Exam Date : NTA ने जेईई मेन 2025 सेशन 1 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. JEE मेन सेशन 1 ची परीक्षा 22 जानेवारी पासून सुरू होणार आहे. रजिस्टर्ड उमेदवारांना नियोजित वेळेवर प्रवेशपत्र दिले जाईल. जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल..

JEE Main 2025 Exam Date : जेईई मेन 2025 सेशन 1 परीक्षेची तारीख जाहीर, संपूर्ण शेड्यूल घ्या जाणून
जेईई मेन 2025 सेशन 1 परीक्षेची तारीख जाहीर
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 12:39 PM

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2025 सेशन 1 परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेचे संपूर्ण शेड्यूल (वेळापत्रक) राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे. तिथे जाऊन उमेदवार हे शेड्यूल चेक करू शकतात. अशा परिस्थितीत NEET UG आणि CUET UG परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. जेईई मेन परीक्षा कधी आणि किती दिवसात घेतली जाईल ते संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊया.

NTA ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, JEE मेन सेशन 1 ची परीक्षा 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घेतली जाईल. जेईई मेन 2025 सेशन 1 साठी 28 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होते. नोंदणीकृत उमेदवारांना 26 ते 27 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. जेईई मेन सेशन 2 हे एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे.

JEE Main 2025 Exam Date How to Check : परीक्षेचं वेळापत्रक कसं कराल चेक ?

nta.ac.in या NTA च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

होप पेजवर दिलेल्या Latest@NTA सेशन वर क्लिक करा.

तेथे जेईई मेन 2025 सेशन 1 एक्झाम डेटवर क्लिक करा.

परीक्षेची तारीख PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.

ती चेक करून तुम्ही प्रिंट काढू शकता.

JEE Main 2025 Session 1 Exam Date : किती दिवसात पार पडणार परीक्षा ?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, JEE मेन 2025 सत्र 1 साठी पेपर 1 BE/B.Tech हा 22,23, 24, 28 आणि 29 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा पार पडेल. पेपर 2 बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगची परीक्षा 30 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 6:30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येईल.

JEE Main 2025 Session 1 Admit Card : कधी मिळणार ॲडमिट कार्ड / प्रवेशपत्र ?

NTA परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधी एक्झाम सिटी स्पिल जारी करेल, रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख वापरून, उमेदवार ते डाउनलोड करू शकतील. त्यानंतर परीक्षेच्या सुमारे 4 दिवस आधी प्रवेशपत्र जारी केले जाईल. मात्र एक्झाम सिटी स्पिल आणि प्रवेशपत्र जारी करण्याची अधिकृत तारीख अद्याप घोषित झालेली नाही.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.