मुंबई : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी IIT JEE Advanced 2023 प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार आता JEE Advanced, jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. जॉईन सीट अलॉटमेंट प्रक्रिया (JoSAA) प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होईल. प्रवेश परीक्षेत (IIT JEE Advanced 2023) उत्तीर्ण झालेले उमेदवार भारतातील टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी खाली पाहू शकतात.
जेईईच्या दोन्ही पेपरमध्ये देशभरातून 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.
JEE Advanced 2023 च्या प्रवेश परीक्षेत, हैदराबाद झोनच्या वी चिदविलास रेड्डी याने 360 पैकी 341 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे, तर मुलींमध्ये हैदराबादच्या नायकांती नागा भव्य हिने 298 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. IIT JEE Advanced 2023 मध्ये पात्र झालेले उमेदवार आता रँक आणि स्कोअरच्या आधारावर देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.
1 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास, चेन्नई (तामिळनाडू) | 89.79 |
2 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी दिल्ली (नवी दिल्ली) | 87.09 |
3 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (महाराष्ट्र) | 80.74 |
4 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपुर (उत्तर प्रदेश) | 80.65 |
5 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुड़की (उत्तराखंड) | 75.64 |
6 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खड़गपुर (पश्चिम बंगाल) | 73.76 |
7 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी गुवाहाटी (आसाम) | 70.32 |
8 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हैदराबाद (तेलंगाना) | 70.28 |
9 | नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) | 69.71 |
10 | जादवपूर यूनिवर्सिटी, कोलकाता (पश्चिम बंगाल) | 67.04 |