CTET ची आज परीक्षा, पास होण्यासाठीचे निकष ते नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET 2024 Guidelines: CTET परीक्षा देणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. डिसेंबर सत्रासाठी CTET परीक्षा आज घेण्यात येणार आहे. CBSE तर्फे ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवारांना कोणते नियम पाळावे लागतील, याची माहिती जाणून घेऊया.

CTET ची आज परीक्षा, पास होण्यासाठीचे निकष ते नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Exam
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 8:04 AM

CTET 2024 Exam Guidelines: कोणतीही परीक्षा असली की नियम असतातच. तुम्ही आज होणारी CTET परीक्षा देणार असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. एखादी छोटी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. डिसेंबर सत्रासाठी CTET परीक्षा आज घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जाताना काय नियम पाळावे, याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) CTET 2024 डिसेंबर सत्राची परीक्षा आज 14 डिसेंबर रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. CBSE ने सर्व नोंदणीकृत उमेदवारांना प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप हॉल तिकीट डाऊनलोड केलेले नाही. ते ctet.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून ते डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना कोणते नियम पाळावे लागतील आणि परीक्षा केंद्रावर काय काळजी घ्यावी लागले, जाणून घेऊया.

CTET परीक्षेत दोन पेपर

CTET परीक्षेत दोन पेपर असतील. पहिला पेपर इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षक पात्रतेसाठी तर दुसरा पेपर सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षक पात्रतेसाठी असेल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पेपर 2 पहिल्या शिफ्टमध्ये घेण्यात येणार असून, त्याची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 12 अशी आहे. पेपर 1 दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार आहे.

परीक्षेला काय घेऊन जावे?

CTET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असे छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटोही काढावे लागतील. उमेदवार आपल्यासोबत ट्रान्सपरंट बाटलीत पाणी घेऊन जाऊ शकतात.

परीक्षेला काय घेऊन जाऊ नये?

उमेदवारांना कॅलक्युलेटर, स्मार्ट वॉच किंवा ब्लूटूथ सारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस परीक्षा हॉलमध्ये नेण्याची परवानगी नाही. परीक्षेत बॅग, पाकीट, लेखी साहित्य, स्टडी नोट्स, गाईड यांना बंदी घालण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार CDSE ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना पाहू शकतात.

रिपोर्टिंग वेळ काय?

पहिल्या शिफ्टच्या परीक्षेसाठी उमेदवाराला सकाळी 7.30 वाजता केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. तर दुसऱ्या शिफ्टच्या परीक्षेसाठी दुपारी 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. नियोजित वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

पास होण्याचे निकष काय?

CTET परीक्षेत एकूण 150 गुण असतात. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 टक्के म्हणजेच 90 गुण मिळणे आवश्यक आहे. तर SC, ST आणि इतर मागासप्रवर्ग आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 150 पैकी 55 टक्के म्हणजेच 82 गुण मिळवणे आवश्यक आहे.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.