देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही तारीख 15 मे वरून 20 मे 2022 करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर तुम्ही लगेच नीट neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. यावेळी एनईईटी यूजी 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. यापूर्वी, एनईईटी यूजीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 6 मे होती, जी 15 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच तारीख 20 मे २०२२ रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरण्याची मुदत 20 मे 2022 च्या रात्री 11.50 पर्यंत आहे. देशातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
एनईईटी यूजीसाठी अर्ज करणार् या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1600 रुपये शुल्क भरावे लागेल. ईडब्ल्यूएस, ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1500 रुपये आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900 रुपये आहे.
नीट यूजी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी लाइफ सायन्सेस आणि व्हेटर्नरी मेडिसीन या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा घेतली जाते.